लव्ह लाईफ विथ ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 18:46 IST2017-01-25T13:14:57+5:302017-01-25T18:46:08+5:30

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार अर्थात युसुफ खान बॉलिवूडमधील सुपरस्टार. त्यामुळे मोठे ग्लॅमर त्यांच्यासभोवताली असणे साहजिक. त्या काळातल्या अनेक तरुणींचा ...

Love Life With Tragedy King Dilip Kumar | लव्ह लाईफ विथ ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार

लव्ह लाईफ विथ ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार

्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार अर्थात युसुफ खान बॉलिवूडमधील सुपरस्टार. त्यामुळे मोठे ग्लॅमर त्यांच्यासभोवताली असणे साहजिक. त्या काळातल्या अनेक तरुणींचा त्यांच्यावर जीव होता. अनेक अभिनेत्रींनाही दिलीप कुमार यांच्यासोबत काम करणे आवडायचे. दिलीप कुमारसोबत काम करणे म्हणजे चित्रपट हिट होणे, असेच काहीसे गणित होते. दिलीप कुमार यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. अखेर त्यांनी आपल्यापेक्षा वयाने खूप लहान असणाºया सायरा बानो यांच्यासोबत लग्न केले आणि या वादावर पडदा पाडला. दिलीप कुमार यांच्या अशाच काही प्रेम कहाण्यांबाबत..



कामिनी कौशल
दिलीप कुमार यांचे सुरुवातीला कामिनी कौशल या अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण होते. शहीद या चित्रपटाच्या सेटवर या दोघांचे प्रेम जुळले. या दोघांनी लग्नाचा विचारही केला होता, मात्र कामिनी यांच्या बंधूचा या लग्नास विरोध होता. कामिनी यांनी आपल्या वारलेल्या बहिणीच्या नवºयासोबत लग्न केले. आपल्या बहिणीच्या अनाथ मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. कामिनी यांच्या भावाने दिलीप कुमार यांना दूर राहण्यास सांगितले होते, असेही सांगण्यात येते.



मधुबाला
दिलीप कुमार यांचे नाव त्यानंतर भारतीय चित्रपटातील ब्युटी क्वीन मधुबाला यांच्याशी जोडले गेले. हे दोघे लवकरच लग्न करणार अशी स्थिती असताना या दोघांमध्ये ब्रेकअप झाला. दिलीप कुमार यांचा इगो आडवा आला, असे सांगतात. एका ठिकाणावरील शूटिंगला मधुबालाचे वडील तयार नव्हते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलीप कुमार यांना मधुबाला यांच्याकडे रदबदलीविषयी विनंती केली. दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना सांगितले, मात्र आपण वडिलांचा निर्णय मान्य करणार असल्याचे सांगितले. मधुबाला यांचे वडील रागाला गेले. शेवटी हा निर्णय कोर्टात गेला. मधुबाला यांच्याविरोधात निकाल लागला. घेतलेली रक्कम परत करण्याचा आदेश मधुबाला यांना देण्यात आला. शेवटी मधुबाला यांनी दिलीप कुमार यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी वडिलांची माफी मागण्यास सांगितले. दिलीप कुमार यांनी यास नकार दिला. त्यामुळे या दोघांचे प्रेमप्रकरण तिथेच संपले. 



वैजयंतीमाला
दिलीप कुमार यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंतीमाला यांच्यासोबत सहा चित्रपट केले होते. या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान होती. अनेकांच्या मते वैजयंतीमाला यांचे दिलीप कुमार यांच्यावर प्रेम होते. कामिनी कौशल आणि मधुबाला यांच्यानंतर दिलीप कुमार यांचे हे तिसरे प्रेम.



वहिदा रहमान
सलग तीन यशस्वी चित्रपटात दिलीप कुमार आणि वहिदा रहमान यांनी काम केले होते. वहिदा या दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक होत्या. सेटवर त्यांनी दिलीप कुमार यांना आपले प्रेम दिल्याचे सांगण्यात येते. सायरा बानो त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वी काही काळासाठी हे दोघे डेटवर गेले.



सायरा बानो
मधुबालासोबतच्या ब्रेकअपनंतर त्यांची भेट सायरा बानो यांच्याशी झाली. एका चित्रपटात सायरा बानो या वयाने खूप लहान असल्याच्या कारणावरून दिलीप कुमार यांनी काम करण्यास नकार दिला. यावेळी आपण वयाच्या १२ व्या वर्षापासून दिलीप कुमार यांच्या प्रेमात असल्याचे सायरा बानो म्हणाल्या. दोघांचे या प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. त्यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ होते, तर सायरा बानो यांचे वय २२ होते.



आस्माँ
दिलीप कुमार यांचे नाव पाकिस्तानी महिला आस्माँ यांच्याशीही जोडले गेले. दिलीप कुमार यांनी यासाठी सायरा बानो यांच्याशी घटस्फोट घेतल्याचे सांगण्यात येत होते. त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. आस्माँ या दिलीप कुमार यांना फसवत होत्या, हे त्यांना पटले नाही. त्यांनी पुन्हा सायरा बानो यांच्याशी पुनर्विवाह केला, असेही सांगण्यात येते.
या प्रकरणानंतर सायरा बानो यांनी चित्रपटात काम करणे सोडून दिले. त्यांनी गृहिणी म्हणून काम करणे पसंत केले. त्यानंतर हे दोघे गेल्या ५० वर्षांपासून आनंदाने एकत्र राहत आहेत.



 

Web Title: Love Life With Tragedy King Dilip Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.