अनुष्कासाठी प्रेम म्हणजे सर्व काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 12:03 IST2016-06-21T06:33:41+5:302016-06-21T12:03:41+5:30

अनुष्का शर्मासाठी प्रेमला खूप महत्त्व देते. हे आम्ही नाही तर ती स्वत: म्हणतेय. नुकतेच एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, ...

Love for Anushka is everything | अनुष्कासाठी प्रेम म्हणजे सर्व काही

अनुष्कासाठी प्रेम म्हणजे सर्व काही

ुष्का शर्मासाठी प्रेमला खूप महत्त्व देते. हे आम्ही नाही तर ती स्वत: म्हणतेय.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, प्रेम अनेक रंग, रुप, आकरात आपल्या आयुष्यात येत असते. त्याचा खुल्या मनाने स्वीकार करणे गरजेचे असते. कारण खरं प्रेम केवळ सुखातच नाही तर पडत्या काळातही आपल्यासोबत असते, संकटात आपली पाठराखण करत असते. त्यामुळे नात्यात जर थोडा तणाव आला तर लगेच हार मानू नका. नात्याला घट्ट करण्यासाठी प्रयत्न करा.’

आता ती हे सगळं विराटला उद्देशून तर नाही ना म्हटली, असा विचार कोणाच्याही डोक्यात येणे शक्य आहे. कारण गेले काही त्यांचे ब्रेक-अप झाल्याची बातमी होती.

मात्र, वर म्हटल्याप्रमाणे अनुष्का सध्या नात्याला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. विराटही झाले-गेले विसरून तिच्यासोबत वेळ घालवत आहे.

मुलाखतीच्या शेवटी ती म्हणाली की, प्रेमात अपेक्षांना आवर घालून समोरील व्यक्तीला आहे तसे आपलं मानावं. त्याला त्याची स्पेस द्यावी. ऐकलं का विराट!!?
 

Web Title: Love for Anushka is everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.