लव्ह इज इन द एअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 20:06 IST2016-05-07T14:36:52+5:302016-05-07T20:06:52+5:30

छोटे नवाब सैफ अली खान आपल्या मुलांबाबत प्रोटेक्टिव्ह आहे. खास करुन लेक सारा हिची तो खास काळजी घेतो. मात्र ...

Love is in the air | लव्ह इज इन द एअर

लव्ह इज इन द एअर

टे नवाब सैफ अली खान आपल्या मुलांबाबत प्रोटेक्टिव्ह आहे. खास करुन लेक सारा हिची तो खास काळजी घेतो. मात्र आता हीच स्टारकन्या आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत बी-टाऊनमध्ये एंट्री मारण्यासाठी सज्ज आहे.

अशातच ही नवाब कन्या आता प्रेमात पडली आहे. वीर पहारियावर सारा लट्टू झाल्याच्या चर्चा सध्या रंगल्यात. आता हा वीर कोण असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.

हा वीर म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि बडे राजकारणी सुशीलकुमार शिंदे यांचा नातू. काही दिवसांआधी वीर आणि सारा एकमेंकांना भेटले आणि बघता बघता प्रेमात पडले..

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची लव्हस्टोरी फुलत चाललीय. इतकंच नाही तर त्यांचे काही फोटोही इंटरनेटवर व्हायरल झालेत.

Web Title: Love is in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.