​ केएसजीने गोंदवला ‘लॉर्ड शिवा टॅटू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 19:16 IST2016-09-06T13:46:33+5:302016-09-06T19:16:33+5:30

बिप्सचा लाडका हबी करणसिंह ग्रोवरचे टॅटू प्रेम तुम्हाला ठाऊक आहेच. करणच्या उजव्या दंडावर  बायबलला समर्पित टॅटू आहे. तर डाव्या ...

Lord Shiva Tattoo ' | ​ केएसजीने गोंदवला ‘लॉर्ड शिवा टॅटू’

​ केएसजीने गोंदवला ‘लॉर्ड शिवा टॅटू’

प्सचा लाडका हबी करणसिंह ग्रोवरचे टॅटू प्रेम तुम्हाला ठाऊक आहेच. करणच्या उजव्या दंडावर  बायबलला समर्पित टॅटू आहे. तर डाव्या हातावर चीनी डिझाईनसह अन्य तीन सिम्बॉलिक आर्ट वर्कचा टॅटू आहे. करणचा पहिला टॅटू ड्रॅगनचा होता. यानंतर त्याने पायावर इंक  करून ‘सुपरस्टार’ असा टॅटू गोंदवला आणि आता करणने भगवान शिवाचा टॅटूही गोंदवून घेतला.  ‘लॉर्ड शिवा टॅटू’ काढण्याची प्रेरणा कुठून मिळाली, असे करणला विचारले असता त्याने अतिशय प्रामाणिक उत्तर दिले. मला टॅटू काढणे आवडते. शिवशक्तीत एक वेगळीच ऊर्जा आहे. ही ऊर्जा मला अपार शक्ती आणि हिंमत देते. त्यामुळे मी  ‘लॉर्ड शिवा टॅटू’ काढण्याचे ठरवले, असे करणने सांगितले.
बॉलिवूडमध्ये अजय देवगण आणि संजय दत्त यांनीही लॉर्ड शिवाचा टॅटू काढला आहे. अजयचया छातीवर तर संजयच्या हातावर  भगवान शिवाचा टॅटू आहे.

Web Title: Lord Shiva Tattoo '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.