पाहा : ‘बेवॉच’ चित्रपटातील प्रियांका चोप्राचे ५ हॉट स्टिल्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 14:50 IST2017-01-10T14:49:35+5:302017-01-10T14:50:58+5:30

‘बेवॉच’ च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये प्रियांका ही स्वत:ची व्यक्तीरेखा ‘व्हिक्टोरिया लीड्स’ ची माहिती करून देताना दिसते. चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका केली आहे.

Look: Priyanka Chopra's 5 Hot Stills in the movie Bevoach! | पाहा : ‘बेवॉच’ चित्रपटातील प्रियांका चोप्राचे ५ हॉट स्टिल्स!

पाहा : ‘बेवॉच’ चित्रपटातील प्रियांका चोप्राचे ५ हॉट स्टिल्स!

ेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाचा पहिला ट्रेलर तुम्ही पाहिलाच असेल. पहिल्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही क्वचित ठिकाणी दिसते. मात्र, नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ‘बेवॉच’ च्या दुसऱ्या  ट्रेलरमध्ये प्रियांका ही स्वत:ची व्यक्तीरेखा ‘व्हिक्टोरिया लीड्स’ ची माहिती करून देताना दिसते. चित्रपटात तिने खलनायिकेची भूमिका केली असून यातील तिचे ५ हॉट स्टिल्स तुम्हाला  नक्कीच आवडतील. 

                              

                             

                              

‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शोनंतर प्रियांका चोप्रा हिने ‘बेवॉच’ चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. प्रियांका करत असलेल्या व्हिक्टोरियाची व्यक्तीरेखा चित्रपटात एन्ट्री करताच मुख्य अभिनेता द्वेने जॉनसन (हेल) हा त्याच्या ध्येयापासून थोडा ढळतो. ‘बेवॉच’ हा कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमुळे प्रियांकाच्या फॅन्सची घोर निराशा झाली होती. मात्र, या दुसऱ्या  ट्रेलरमुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच दिलासा मिळालाय. प्रियांकाने तिच्या ‘व्हिक्टोरिया’ या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. याअगोदर तिने अक्षय कुमार आणि करिना कपूरच्या ‘ऐतराज’ मध्येही निगेटिव्ह भूमिका केली आहे. पण, सुत्रांनुसार, ‘बेवॉच’ मधील व्हिक्टोरिया ही व्यक्तीरेखा ‘ऐतराज’ मधील व्यक्तीरेखेपेक्षा अनेक पटींनी जास्त चांगली आहे. 

                                

                                

बॉलिवूडबरोबरच जागतिक पातळीवर नाव कमावण्यासाठी प्रियांका चोप्रा हिने ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही शोच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये डेब्यू केला. हॉलिवूडमध्ये काम करण्याचा पीसीचा निर्णय हा अत्यंत आव्हानात्मक होता. आता ‘बेवॉच’ च्या माध्यमातून तिला द्वेने जॉन्सन सारख्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळतेय. त्यामुळे तिचा अभिनय दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहे, यात काही शंकाच नाही. 


 

Web Title: Look: Priyanka Chopra's 5 Hot Stills in the movie Bevoach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.