पाहा, आफताब शिवदासानीच्या ‘सेकंड मॅरेज’चे रॉयल फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 15:16 IST2017-09-01T09:46:15+5:302017-09-01T15:16:15+5:30

होय, तुम्ही ऐकता ते बरोबर आहे. ‘मस्ती’,‘ग्रॅण्ड मस्ती’सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता आफताब शिवदासानी  श्रीलंकेत एका ग्रॅण्ड सोहळ्यात लग्नबंधनात अडकला. ...

Look, the photo of Aftab Shivdasani's 'Second Marriage'! | पाहा, आफताब शिवदासानीच्या ‘सेकंड मॅरेज’चे रॉयल फोटो!

पाहा, आफताब शिवदासानीच्या ‘सेकंड मॅरेज’चे रॉयल फोटो!

य, तुम्ही ऐकता ते बरोबर आहे. ‘मस्ती’,‘ग्रॅण्ड मस्ती’सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता आफताब शिवदासानी  श्रीलंकेत एका ग्रॅण्ड सोहळ्यात लग्नबंधनात अडकला. पण थांबा...थांबा...आफताब विवाहित आहे, म्हणजे त्याने दुसरे लग्न केले की काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर नाही. आफताबने लग्न केलेय, दुसºयांदा केलेय. पण पत्नी नीन दोसांज हिच्यासोबतच केलेय. म्हणजेच २०१४ मध्ये लग्न बंधनात अडकलेल्या या जोडप्याने पुन्हा एकदा हिंदू रिती-रिवाजानुसार  लग्न केले आहे. श्रीलंकेत हर ग्रॅण्ड लग्न सोहळा झाला. आफताबचा जवळचा मित्र तुषार कपूर या लग्नाला हजर होता.



२०१४ मध्ये आफताब व नीन यांनी कोर्ट मॅरेज केले होते. आता त्यांनी विधीवत लग्न केले. सोशल साईटवर आफताब व नीनच्या या रॉयल लग्नाचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नीन योशिताने डिझाईन केलेल्या सॉफ्ट पिंक लाच्यात दिसते आहे.  आफताबनेही लग्नाचे काही फोटो खास शेअर केले आहेत. ‘माझी प्रिये, तुझ्यासाठीचे माझे प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. तुझ्याशिवाय दुसरा आनंदच नाही. तू माझ्या आयुष्यात आलीस, यासाठी मी रोज परमेश्वराचे आभार मानतो, ’ असे कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.



नीनची बहीण प्रवीण दोसांज हिनेही या लग्नाचे सोशल अपडेट शेअर केले आहेत. प्रवीणने अभिनेता कबीर बेदीसोबत लग्न केलेय.



‘मिस्टर इंडिया’,‘शेहंशाह’,‘चालबाज’ यासारख्या चित्रपटांत बाल कलाकार म्हणून आफताब दिसला. १९९९ मध्ये ‘मस्त’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केले. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर त्याची हिरोईन होती. यानंतर आफताबने बरेच चित्रपट केलेत. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

Web Title: Look, the photo of Aftab Shivdasani's 'Second Marriage'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.