पाहा : ‘बॅन्जो’चे दुसरे गाणे ‘उडन छू...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 17:54 IST2016-08-23T12:24:05+5:302016-08-23T17:54:05+5:30
अभिनेता रितेश देशमुख व नर्गिस फाखरी यांचा आगामी चित्रपट ‘बॅन्जो’चे ‘उडन छू...हुआ हुआ मेरा चैन उडन छू...’ हे दुसरे गाणे आज रिलीज झाले.

पाहा : ‘बॅन्जो’चे दुसरे गाणे ‘उडन छू...’
अ िनेता रितेश देशमुख व नर्गिस फाखरी यांचा आगामी चित्रपट ‘बॅन्जो’चे ‘उडन छू...हुआ हुआ मेरा चैन उडन छू...’ हे दुसरे गाणे आज रिलीज झाले. नर्गिसच्या प्रेमात हरवलेला रितेश या गाण्यात पाहायला मिळणार आहे. मद्याच्या नशेत धुंद झालेला रितेशला फक्त आणि फक्त नर्गिस दिसते आणि तो तिच्यात अक्षरश: हरवून जातो, तिच्यासोबत रोमान्स करतो आणि कल्पनेत लग्नही करतो, असा हा ट्रॅक आहे. हृदय गट्टानी याच्या आवाजात स्वरबद्ध केलेले हे गाणे लिहिलेय अमिताभ भट्टाचार्य यांनी. रितेशचे फॅन असाल आणि रोमॅन्टिक गाण्यांचे चाहते असाल तर हे गाणे तुम्हा नक्की आवडेल. तेव्हा पाहा तर...