​‘बार बार देखो’ही ‘सैराट’च्या वाटेवर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 19:52 IST2016-08-22T14:22:46+5:302016-08-22T19:52:46+5:30

‘बार बार देखो’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनी लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ...

Look again and again on the way to 'sarat' !! | ​‘बार बार देखो’ही ‘सैराट’च्या वाटेवर!!

​‘बार बार देखो’ही ‘सैराट’च्या वाटेवर!!

ार बार देखो’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनी लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चित्रपटासाठी नवी मार्केटींग स्ट्रॅटेजी अवलंबण्यात आल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरु आहे. सूत्रांच्या मते, ‘सैराट’ या सुपरडूपर हिट मराठी चित्रपटाने स्वीकारलेल्या मार्केटींग स्ट्रॅटेजीनुसार ‘बार बार देखो’ची प्रसिद्धी सुरु आहे. होय, ‘सैराट’च्या मेकर्सनी ट्रेलरच्या आधी गाण्यांवर फोकस केला होता. गाण्यांचे टीजर, मग फर्स्ट लूक आणि नंतर संपूर्ण गाणे रिलीज केल्यानंतर ट्रेलर जारी करण्यात आला होता. यामुळे प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यात ‘सैराट’ यशस्वी ठरला आणि ‘सैराट’ मराठी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतचा सर्वाधिक सुपरहिट चित्रपट ठरला. ‘सैराट’ची हिच स्ट्रॅटेजी ‘बार बार देखो’च्या मेकर्सनी अवलंबली आहे. ‘बार बार देखो’च्या फर्स्ट लूकनंतर लगेच सिद्धार्थ मल्होत्रा व कॅटरिना कैफ यांच्यावर चित्रीत ‘काला चश्मा’ हे गाणे लॉन्च केले गेले होते. हे गाणे रिलीज झाले आणि प्रचंड लोकप्रीय झाले. त्याचा फायदा चित्रपटाच्या ट्रेलरला झाला. कदाचित त्याचमुळे प्रेक्षक ‘बार बार देखो’ आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. येत्या ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Web Title: Look again and again on the way to 'sarat' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.