‘प्लॉन बी’च्या तयारीसाठी वीर जाणार लंडनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:27 IST2016-12-06T18:27:15+5:302016-12-06T18:27:15+5:30
अभिनेता व हास्य कलाकार वीर दासने हास्य भूमिकांतून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्याच्या अभिनयाचे कौशल्य त्याने ...

‘प्लॉन बी’च्या तयारीसाठी वीर जाणार लंडनला
अभिनेता वीर दास आपल्या स्टॅडअप कॉमेडीसाठी ओळखला जातो. मात्र त्याने ‘३१ आॅक्टोबर’ व मिलाफ झवेरी यांचा लघुपट ‘राख’ यात केलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच नजरेत भरली. आता तो आपल्या नव्या चित्रपटासाठी बरीच तयारी करीत असल्याची माहिती मिळत आहे. वीर दास आगामी ‘प्लॉन बी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. प्लॉन बी नावाप्रमाणेच अॅक्शन चित्रपट असून, यात वीर अॅक्शन दृष्ये करताना दिसले.
‘प्लॉन बी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन हरीश रावत करणार आहेत. प्रथमच अॅक्शनपटात काम करण्यासाठी वीर दासही उत्सूक आहे. या चित्रपटात तो स्टंट सीन स्वत: करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अॅक्शन व या चित्रपटात वापरण्यात येणाºया विशेष तंत्रज्ञानाची माहिती व ट्रेनिंग घेण्यासाठी तो लंडनाला जाणार आहे. लंडनमध्ये तो ३० दिवसांचे एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग घेणार आहे. प्लॉन बीच्या शूटिंगला नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात येते.
आतापर्यंत आपण वीरला स्टँडअप कॉमेडी, कॉमिक रोल व गंभीर भूमिकांत पाहिले आहे. आता तो अॅक्शन दृष्ये करणार असल्याने त्याचे हे नवे रुप पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असणारच. या नव्या रोलमध्येही तो प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.