इरफान खानच्या चित्रपटासाठी रेकॉर्ड झाले लाईव्ह म्युझिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 17:20 IST2017-01-25T11:50:56+5:302017-01-25T17:20:56+5:30
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी तो ड्वेन ब्राऊन यांच्या ‘इन्फर्नो’ या हॉलिवूडपटात ...

इरफान खानच्या चित्रपटासाठी रेकॉर्ड झाले लाईव्ह म्युझिक
ब लिवूड अभिनेता इरफान खान आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी तो ड्वेन ब्राऊन यांच्या ‘इन्फर्नो’ या हॉलिवूडपटात दिसला होता. आता तो ‘द साँग आॅफ स्कॉर्पियन’ या आणखी एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. २०१५ साली अशी बातमी आली होती की, इरफान खान लवकरच अभिनेत्री- संगीतकार गोल्शीफतेह फरहानी सोबत चित्रपट करीत आहे. हा चित्रपट येत्या जूनमध्ये रिलीज होणार आहे.
इरफानचा आणखी एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन अनूप सिंह करणार असून यात इरफान एका ऊंट व्यापाºयाची भूमिका साकारणार आहे. गोल्शीफतेह या चित्रपटात संगीताच्या माध्यमातून इलाज करणाºया महिलेची भूमिका साकारत आहे. यामुळे या चित्रपटात संगीत हा अतिशय महत्त्वाचा भाग असणार आहे. इरफान हा स्वत: जागतिक संगीताचा चाहता आहे. संगीताची शैली कोणतीही असो त्यातून भावना व्यक्त केल्या जातात, असे त्याला वाटते. २०१३ साली त्याने याबद्दलची घोषणा करताना मी लवकरच संगीत प्रधान चित्रपटात काम करणार आहे असे इरफानने सांगितले होते. यामाध्यमातून त्याला सेक्सोफोन सारखे वाद्य शिकायला मिळेल, अशी त्याची भूमिका होती. Read More : इरफान खानचा रोमांटिक अंदाज : ‘हिंदी मीडियम’चा फर्स्ट लूक
![]()
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द सॉंग आॅप स्कॉर्पियन’मध्ये सात गाणी असून त्याला संगीतबद्ध करण्यात आले आहे. ही गाणी चित्रपटासोबतच रिलीज केली जाणार आहेत. विशेष म्हणजे यातील दोन गाणी जैसलमेरच्या वाळवंटात लाईव्ह रेकॉर्ड करण्यात आली आहेत. यामुळे या गाण्याशी त्याने स्वत:ला जोडले असल्याचे सांगण्यात येते. या गाण्यात स्थानिक कलावंत दिसतील. विशेष म्हणजे हे गाणे कडाक्याच्या थंडीत शूट करण्यात आले आहे. ‘द सॉंग आॅफ स्कॉर्पियन’मध्ये इरफानसोबतच वहिदा रहेमान व शशांक अरोडा यांच्या भूमिका असून यात राजस्थानी संवाद व राजस्थानातील सोनेरी वाळूचे चित्रिकरण करण्यात आले आहे. इरफान राजस्थानातील असल्याने या चित्रपटामुळे त्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. Read More : इरफान खान म्हणतो, जयपूर थेअटरचे ॠ ण चुकविण्याची ही संधी
आपल्या कामाप्रती इमानदार असलेला इरफान आगामी चित्रपटातून कोणते आश्चर्य दाखवितो हे पाहणे, औत्सुक्याचे ठरणार आहे. याच दरम्यान १२ मे रोजी इरफानचा हिंदी मीडिअम हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.
ALSO READ :
‘रॉकस्टार’ होण्यासाठी इरफान करतोय मेहनत!
इरफान खान-दीपक डोबरियाल येणार एकत्र