​पुन्हा दिसला लिसा हेडनचा बेबी बम्पमधील हॉट अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 11:56 IST2017-03-08T06:26:34+5:302017-03-08T11:56:34+5:30

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आई होणार आहे. सध्या लिसा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. या वर्षाच्या सुरुवातीला कुणाच्याही ध्यानीमनी नसताना ...

Lisa Hayden's Baby Bumped Hot Avatar! | ​पुन्हा दिसला लिसा हेडनचा बेबी बम्पमधील हॉट अवतार!

​पुन्हा दिसला लिसा हेडनचा बेबी बम्पमधील हॉट अवतार!

लिवूड अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आई होणार आहे. सध्या लिसा प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. या वर्षाच्या सुरुवातीला कुणाच्याही ध्यानीमनी नसताना लिसाने सगळ्यांना गोड बातमी दिली होती. स्वत:चा बिकनीतील एक फोटो पोस्ट करत तिने ती आई होणार असल्याची घोषणा केली होती. निळ्या रंगाच्या बिकिनीत ती बेबी बम्प दाखवताना दिसली होती. यानंतर लिसाने बेबी बम्पचे अनेक फोटो शेअर केलेत. अगदी काही दिवसांपूर्वी मैत्रिणींसोबतचे समुद्र किनाºयावरचे बेबी बम्प दाखवणारे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.  आत्ताही लिसाने अगदी ताजा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना लिसाने लिहिले आहे,‘पोलारॉइड्स’. या फोटो पांढºया रंगाच्या ड्रेसमध्ये लिसा अतिशय हॉट दिसतेय. शिवाय यात तिचा बेबी बम्पही स्पष्ट दिसतोय. 



ALSO READ : Hot Photo : लिजा हेडनने बेबी बंपचे फोटो पुन्हा केले शेअर

 अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये लिसा अखेरची दिसली होती. यात अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय, रणबीर कपूर आणि फवाद खान आदी मुख्य भूमिकेत होते..   सध्या लिसा शॉर्ट टीव्ही सीरिज ‘द ट्रिप’ या सिरियलमुळेही चर्चेत आहे. मुळात लिजाने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. आता ती अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे.  लिसाने गतवर्षी आक्टोबरमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड डिनो ललवानी याच्याशी लग्न केले होते. डिनो हा पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या ब्रिटीश व्यावसायिकाचा मुलगा आहे. चेन्नईत जन्मलेली लिसा बरीच वर्षे विदेशात राहिलीय. आधी आॅस्ट्रेलिया, मग अमेरिकेत ती राहिली. यानंतर अभिनेत्री बनण्यासाठी तिने मुंबई गाठली. बॉलिवूडमध्ये ती ‘आयशा’, ‘क्वीन’,‘हाऊसफुल3’,‘ऐ दिल है मुश्किल’ अशा अनेक सिनेमांत दिसली.

Web Title: Lisa Hayden's Baby Bumped Hot Avatar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.