लिपस्टीक अंडर माय बुरखा: अशोक पंडित यांनी केला पंकज निहलानींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 18:08 IST2017-02-24T12:38:13+5:302017-02-24T18:08:13+5:30

केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) प्रकाश झा यांच्या ‘लिपस्टीक अंडर माय बुरखा’ या चित्रपटास प्रमाणित करण्यास नकार दिल्याने ...

Lipstick Under My Barkha: Ashok Pandit accused of Pankaj Nihalani | लिपस्टीक अंडर माय बुरखा: अशोक पंडित यांनी केला पंकज निहलानींवर आरोप

लिपस्टीक अंडर माय बुरखा: अशोक पंडित यांनी केला पंकज निहलानींवर आरोप

ंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) प्रकाश झा यांच्या ‘लिपस्टीक अंडर माय बुरखा’ या चित्रपटास प्रमाणित करण्यास नकार दिल्याने मंडळाचे सदस्य अशोक पंडित यांनी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याविरूद्ध टीका केली आहे.
अशोक पंडित यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. या चित्रपटास मंडळाने पास केले नसल्याने हा निहलानी यांचा मनमानीपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंडळाने गुरूवारी लिपस्टीक अंडर माय बुरखा या चित्रपटास प्रमाणीकरण करण्यास नकार दिला होता. हा चित्रपट महिलांवर आधारित असून, महिलांच्या आयुष्यांतील कल्पना दाखविण्यात आल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात अनेक अश्लील दृष्ये असून, अपमानास्पद भाषा वापरण्यात आल्याचे  प्रमाणपत्र नाकारताना म्हटले आहे.
 

पंडित यांनी यासंदर्भात एएनआयला सांगितले, ‘मंडळाचा सदस्य म्हणून मला असे वाटते की महान चित्रपटनिर्माते प्रकाश झा यांना हुकुमशाही प्रवृत्तीच्या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागला. हे देशासाठी अत्यंत दु:खद आहे. मला वाटते ही अतिशय लज्जास्पद आणि वाईट घटना आहे. चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आली आहे.’
अशोक पंडित आणि इतर सदस्यांनी यापूर्वी पहलाज निहलानी यांच्याविरुद्ध निर्णयात मनमानी केला जात असल्याचा आरोप केला होता. उडता पंजाब, एन. एच. १० आणि झा यांचे जय गंगाजल हे चित्रपट चुकीच्या पद्धतीने प्रमाणित करण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. २०१५ साली जेम्स बाँडचा ‘स्पेक्ट्रे’ हा चित्रपट संस्कारी पद्धतीने प्रमाणित करण्यात येऊन यामधील चुंबन दृष्ये काढून टाकण्याबाबत सांगण्यात आले होते, हे चुकीचे असल्याचे म्हटले होते.
लिपस्टीक अंडर मार बुरखा हा चित्रपट अलंकृत श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला असून कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह आदी कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. मसानचे दिग्दर्शक नीरज ग्यानवन यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. 

Web Title: Lipstick Under My Barkha: Ashok Pandit accused of Pankaj Nihalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.