अ‍ॅक्टर कि लाईफ इनसिक्युअर होती है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 14:02 IST2016-12-15T14:02:30+5:302016-12-15T14:02:30+5:30

 प्रियांका लोंढे मोहनीश बहल म्हटला की व्हर्साटाईल अ‍ॅक्टर म्हणून त्याचा चेहरा समोर येतो. अनेक खलनायकी आणि सहायक नायकाच्या भूमिका ...

Life is a life insucier ... | अ‍ॅक्टर कि लाईफ इनसिक्युअर होती है...

अ‍ॅक्टर कि लाईफ इनसिक्युअर होती है...

 प्रियांका लोंढे


मोहनीश बहल म्हटला की व्हर्साटाईल अ‍ॅक्टर म्हणून त्याचा चेहरा समोर येतो. अनेक खलनायकी आणि सहायक नायकाच्या भूमिका साकारल्यानंतर तो आता छोट्या पडद्याकडे वळाला आहे. ‘होशियार’ या क्राईम शोचे तो सूत्रसंचालन करतो आहे. या शो संदर्भात आणि त्याच्या आगामी चित्रपटासंदर्भात त्याला काय वाटते याबाबत मोहनीश बहल याने लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या या गप्पा...

होशियार या शोमध्ये प्रेक्षकांना काय वेगळे पाहायला मिळणार आहे?
-: हा शो इतर क्राईम शोज पेक्षा खूपच वेगळा आहे. यामध्ये आम्ही गुन्हा होऊ नये यासाठी काय करायचे हे दाखवणार आहोत. त्यामुळे या शोमध्ये गुन्हा घडतच नाही. तुम्ही इतर शोज पाहिले तर त्यात गुन्हा झाल्यावर तपास करताना पाहायला मिळतो. या शोची संकल्पना जरी वेगळी आहे. 

पहिल्यांदाच तू या शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे, त्यासाठी काही तयारी केली आहे का?
-: मी पहिल्यांदा जरी सूत्रसंचालन करीत असलो तरी हा शो थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. यामध्ये काही वेगळ करण्याची गरजच नाही. पण हो, मी यामध्ये तुम्हाला वेगळ्या लूकमध्ये जरुर दिसेन. जीन्स, टी-शर्ट आणि एखादया एपिसोडला जॅकेट घातलेल्या लूकमध्ये तुम्ही मला पाहू शकता.

सध्या टी. व्ही. वर अनेक रिअ‍ॅलिटी शोज सुरू आहेत. तुझा आवडता सूत्रसंचालक कोण आहे?
_-: मला सलमानचा बिग बॉस हा शो फारच आवडतो. सलमानने त्या शो ला एका वेगळ््या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मला जर विचाराल तर मी फक्त सलमानसाठी म्हणजे शनिवार आणि रविवारचा तो शो पाहतो. ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन केले होते त्याच प्रकारे सलमान देखील फक्त बिग बॉससाठी ओळखला जातो. त्यासारखे सूत्रसंचालन कोणीच करु शकत नाही. त्यामुळे मला तरी सूत्रसंचालक म्हणून सलमानच आवडतो.

तू प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये पुन्हा कधी दिसणार ?
-: सध्या तरी माझ्याकडे एकही चित्रपट नाही. मला गेल्या काही दिवसांमध्ये जे चित्रपट आॅफर झाले ते करण्याची माझी इच्छा नव्हती. प्रेक्षकांच्या मनामध्ये माझी एक वेगळी इमेज आहे. मला प्रेक्षकांनी हम आपके है कौन, हम साथ साथ है अशा प्रकारच्या चित्रपटांमध्येही पाहिले आहे. त्यांनी माझ्यावर भरभरुन प्रेम देखील केले आहे. त्यानंतर मला आॅफर होणारे रोल जर मी केले असते तर आजपर्यंत मी कमावलेले नाव टिकवू शकलो नसतो. मला जर एखाद्या चित्रपटाची कथा आणि भूमिका आवडली तर मी नक्कीच लवकरच तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या पडदयावर दिसू शकेन.

मालिकांमध्ये सध्या खूप बदल झाला आहे, त्याबद्दल काय सांगशील?
-: होय, बदल तर झाला आहे. आणि मी म्हणेन की हा बदल खूपच चांगला आहे. प्रेक्षक देखील एकच गोष्ट पाहून कंटाळतात. पूर्वी सास-बहू मालिका देखील प्रेक्षकांना आवडायच्या. कारण त्यावेळी त्या नवीन होत्या. 
प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळे आणि नवीन हवे असते. त्यामुळे चॅनल आणि लेखक यासाठी सदैव प्रयत्न करत असतात. सध्या टी. व्ही. वर अनेक प्रकारचे चांगले शोज पाहायला मिळतात. अशा कार्यक्रमांना एक खरच मोठा प्रेक्षकवर्ग आहे.  त्यामुळे मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालतात त्यांचा नक्कीच विचार केला जातो. प्रेक्षकांच्या आवडीनुसारच या कार्यक्रमांमध्ये बदल झालेला आहे.
 
मालिकांमध्ये पुन्हा काम करणार का?
-: मला नाही वाटत मी मालिकांमध्ये पुन्हा कधी काम करीन. कारण यासाठी खूपच वेळ दयावा लागतो. दिवसातील १२ ते १४ तास तुम्हाला शूटिंगसाठी दयावे लागतात.  मी यासाठी मानसिकदृष्या आणि शारीरिकदृष्ट्या आता तयार नाही. मला वाटते की कलाकारांचे जीवन हे खरंच फारच असुरक्षित असते. तुम्हाला कधीच समजत नाही की, कोणता चित्रपट तुम्हाला मिळाणार आहे, तो हिट होणार की नाही. हिट झाल्यावर पुन्हा काय होणार. असे असंख्य प्रश्न समोर उभे असतात. कमावलेले नाव टिकवता देखील आले पाहिजे. 

Web Title: Life is a life insucier ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.