रिलीजच्या वेळेस पाहून घेऊ - मनसेचा फरहानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 13:08 IST2016-10-29T13:08:32+5:302016-10-29T13:08:32+5:30

‘ऐ दिल’ वि. मनसे हा वाद आता कुठे निवळला असताना फरहान अख्तरने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करून या वादाला पुन्हा ...

Let's see at the time of release - Mansa's Farhanah Warne | रिलीजच्या वेळेस पाहून घेऊ - मनसेचा फरहानला इशारा

रिलीजच्या वेळेस पाहून घेऊ - मनसेचा फरहानला इशारा

दिल’ वि. मनसे हा वाद आता कुठे निवळला असताना फरहान अख्तरने याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करून या वादाला पुन्हा एकदा तोंड फोडले.

चित्रपट प्रदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी मनसेने ठेवलेल्या अटी मान्य करून चुकीचा पायंडा पाडल्याचे मत फरहानने व्यक्त केले होते. यावर मनसेने त्याला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

फरहानच्या टीकेवर उत्तर देताना अमेय खोपकर म्हणाले की, ‘त्याच्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जवळ येऊ द्या, मग पाहू.’

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकार असलेलले चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचे नाही, अशी मनसेने भूमिका घेतली होती. त्यानुसार ‘ऐ दिल’मध्ये फवाद खान असल्यामुळे या चित्रपटाला जोरादार विरोध चालू होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून या वादावर तोडगा काढला आणि प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. सिनेमा रिलीज होऊ देण्यासाठी मनसेने काही अटी ठेवल्या होत्या. निर्मात्यांनी त्या मान्य केल्यावरच मनसेने विरोध मागे घेतला.

                                Raees
                                रईस 

मात्र या ‘डील’वर फरहानने नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला की, ‘चित्रपट निर्माते आणि कलाकारांनाच्या हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची असून अशा प्रकारे एखाद्या राजयकीय पक्षाच्या दबावाला शासनाने बळी पडू नये.’

फरहान अख्तर निर्मित ‘रईस’ चित्रपटात महिरा खान ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. येत्या २६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Let's see at the time of release - Mansa's Farhanah Warne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.