जाणून घ्या, ऋचा चढ्ढा का गिरवतेय मराठी भाषेचे धडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2017 18:05 IST2017-07-22T12:22:59+5:302017-07-22T18:05:41+5:30

आव्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या  अभिनेत्रींमध्ये ऋचा चढ्ढा हिचे नाव घेतले जाते. तिने ‘इनसाइड एज’ या चित्रपटात जरीना मलिकची भूमिका केली ...

Learn, Richa Chadha's Gerty Marathi Language Lessons? | जाणून घ्या, ऋचा चढ्ढा का गिरवतेय मराठी भाषेचे धडे ?

जाणून घ्या, ऋचा चढ्ढा का गिरवतेय मराठी भाषेचे धडे ?

्हानात्मक भूमिका साकारणाऱ्या  अभिनेत्रींमध्ये ऋचा चढ्ढा हिचे नाव घेतले जाते. तिने ‘इनसाइड एज’ या चित्रपटात जरीना मलिकची भूमिका केली होती. या तिच्या भूमिकेने चाहत्यांसोबतच समीक्षकांक डूनही वाहवा मिळवली. मात्र, आता आमच्याकडे याविषयी एक वेगळीच बातमी आहे. ती म्हणजे ऋचा चढ्ढा ही तिचा आगामी मराठी चित्रपट ‘थ्री स्टोरीज’ मध्ये चाळीत राहणाऱ्या  एका महाराष्ट्रीयन युवतीची भूमिका साकारणार आहे. या तिच्या भूमिकेसाठी ती मराठी भाषेचे धडे गिरवत आहे. तिने मराठी शिकण्यासाठी सह अभिनेत्री रेणुका शहाणे हिची मदत देखील घेतली आहे. तसेच त्यांनी अनेक भाषांचा अभ्यास एकत्र मिळून केल्याचे समजतेय. कौतुकाची बाब तर ही आहे, ऋचा तिच्या सेटवर आणि शेजाऱ्यांसोबत देखील मराठीतच बोलते आहे.  या चित्रपटाविषयी तिला काही विचारले तर ती मीडियाला काहीही माहिती देण्याचे सध्या टाळताना दिसते आहे. 

                                     

‘थ्री स्टोरीज’ या मराठी चित्रपटाची कथा ही चाळीतील तीन वेगवेगळ्या कथांशी निगडीत आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून चित्रपटाचे दिग्दर्शन अर्जुन मुखर्जी यांनी केले आहे. २५ आॅगस्ट रोजी चित्रपट रिलीज करण्यात येणार असल्याचे कळतेय. ‘सरबजीत’ चित्रपटामुळे ऋचा चढ्ढाला प्रसिद्धी आणि फेम दोन्हीही मिळाले. ऋचा चढ्ढा ही अशी अभिनेत्री आहे जी कोणत्याही भूमिकेला कमी लेखत नाही. जी भूमिका तिला मिळाली तिला ती पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. यानंतर ती ‘फुकरे २’ साठीही चर्चेत असल्याचे दिसतेय. आता सध्या तरी ती मराठी भाषेला एन्जॉय करताना दिसते आहे. पाहूयात, या तिच्या मराठी शिकण्याच्या प्रयत्नाला कितपत यश मिळते आहे. 

Web Title: Learn, Richa Chadha's Gerty Marathi Language Lessons?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.