जाणून घ्या कसा आहे, सलमान खानचा ‘रेस३’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 09:36 IST2018-06-15T04:06:02+5:302018-06-15T09:36:02+5:30

 सलमान खानचा ‘रेस३’ आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट असलेल्या ‘रेस३’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय ...

Learn how, Salman Khan's 'Race 3'! | जाणून घ्या कसा आहे, सलमान खानचा ‘रेस३’!

जाणून घ्या कसा आहे, सलमान खानचा ‘रेस३’!

 
लमान खानचा ‘रेस३’ आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट असलेल्या ‘रेस३’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिस अशी सगळी स्टारकास्ट यात आहे. इतकी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट कसा आहे, याबद्दल बॉलिवूड जाणकारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत.
बहुतांश आॅनलाईन पोर्टलनी चित्रपटाला पाच पैकी चार स्टार दिले आहेत. अर्थात काही बोटावर मोजण्याइतक्या इंटरटेनमेंट पोर्टलनी केवळ दोन स्टार देऊन सलमानच्या या चित्रपटाबद्दल नापसंती दर्शवली आहे. सुप्रसिद्ध पत्रकार उमैर संधू यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू पोस्ट केला आहे. त्यानुसार, हा चित्रपट एक ‘मास इंटटेनर मुव्ही’ आहे.   पॉवर पॅक्ड, टाईट स्टोरी, स्क्रीनप्ले व शानदार दिग्दर्शन, ब्लॉकबस्टर, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय सलमानच्या या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत.
filmibeat.comने आपल्या समिक्षेत चित्रपट धमाकेदार असल्याचे म्हटले आहे. जबरदस्त ट्विस्ट-टर्न, शानदार सिनेमेटोग्राफी, दमदार अ‍ॅक्शन आणि अनपेक्षित क्लायमॅक्स यामुळे ‘रेस३’ धमाकेदार असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे. दिग्दर्शक रेमो डिसुजाने चित्रपटाला पूर्ण न्याय दिल्याचेही या संकेतस्थळाने नमूद केले आहे.

ALSO READ : ​कसे पडले सलमान खानचे ‘भाई’ हे नाव?

चित्रपटाची स्टोरी लीक करण्यात आलेली नाही. पण चित्रपटाचा क्लायमॅक प्रचंड रोचक असल्याचे म्हटले जात आहे. समीक्षकांचे मानाल तर, मध्यंतरापूर्वीही चित्रपटात एक मोठा ट्विस्ट आहे.सलमान खान, बॉबी देओलचा शर्टलेस सीन चित्रपटाचा हाईलाईट आहे. जॅकलिन व डेजी दोघीही ग्लॅमरस भूमिकेत आहेत. बॉबीने कमबॅकसाठी जीवतोड मेहनत केली आहे. त्याची मेहनत चित्रपटात स्पष्टपणे दिसतेय.
स्पेशन स्क्रिनिंग शो पाहिलेल्या अनेकांनी हा चित्रपट सलमानच्या चाहत्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दल सर्वाधिक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्सचा कुणीचं अंदाज बांधू शकत नाही, इतका कल्पनेपलिकडचा असल्याचे म्हटले आहे.
peepingmoon.com या एंटरटेनमेंट पोर्टलने मात्र ‘रेस३’ला केवळ दोन स्टार दिले आहेत़. सलमानने या शर्टलेस सीन देण्यापलिकडे काहीही केले नसल्याचे या पोर्टलने म्हटले आहे.

Web Title: Learn how, Salman Khan's 'Race 3'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.