‘बाहुबली2’च्या रिलीजपूर्वीच सरप्राईज झाले Leaked!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 14:58 IST2017-04-10T09:28:20+5:302017-04-10T14:58:20+5:30
‘बाहुबली2’ची रिलीज डेट जवळ जवळ येतेय, तशा चर्चाही वाढू लागल्या आहेत. होय, ‘बाहुबली2’बद्दल सध्या एक नवी बातमी आहे. या ...

‘बाहुबली2’च्या रिलीजपूर्वीच सरप्राईज झाले Leaked!
‘ ाहुबली2’ची रिलीज डेट जवळ जवळ येतेय, तशा चर्चाही वाढू लागल्या आहेत. होय, ‘बाहुबली2’बद्दल सध्या एक नवी बातमी आहे. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते. पण आता हे सरप्राईजच लीक झाले आहे. हे सरप्राईज काय? तर अभिनेता प्रभास या चित्रपटात डबल नाही तर ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. या बातमीने प्रभासच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
‘बाहुबली2’मध्ये प्रभास डबल रोलमध्ये दिसणार, हे तर सगळ्यांना माहित होते. एकीकडे तो शिवुडू (महेंद्र बाहुबली)ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दूसरीकडे तो बाहुबली (अमरेंद्र बाहुबली)ची भूमिका वठवणार आहे. पण प्रभास याशिवाय आणखी एका रोलमध्ये दिसणार आहे. ते म्हणजे महेन्द्र बाहुबलीच्या आजोबाच्या भूमिकेत. धर्मेन्द्र बाहुबली असे त्याच्या या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. सध्या प्रभासच्या या ट्रिपल रोलची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहे. आता यात किती सत्य आहे, हेच आपल्याला ‘बाहुबली2’ रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे. पण ही बातमी खरी असलीच तर प्रभासला तिहेरी भूमिकेत पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. शिवाय धर्मेन्द्र बाहुबलीच्या एन्ट्रीने ‘बाहुबली2’ची कथा कसे वळण घेते, हे पाहणेही औत्युक्याचे ठरणार आहे.
ALSO READ : ‘बाहुबली2’मध्ये प्रभासचा ‘डबल रोल’!!
प्रभासशिवाय या चित्रपटात राणा डग्गुबती, अभिनेत्री तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, सत्यराज आणि रामा कृष्णन असे अनेक जण दिसणार आहेत. एस.एस. राजमौली दिग्दर्शित हा चित्रपट चालू महिन्याच्या अखेरिस रिलीज होतो आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर आत्तापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. हा एक रेकॉर्ड आहे. आता केवळ ‘बाहुबली2’च्या रिलीजची तेवढी प्रतीक्षा आहे.