इंदू सरकारमधील 'ये आवाज है' नवं गाणं लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 17:36 IST2017-07-07T12:06:59+5:302017-07-07T17:36:59+5:30

मधुर भंडारकर यांच्या आगामी चित्रपट इंदु सरकारमधले 'ये आवाज है' नवं गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं अभिनेत्री ...

Launch of the new song 'Ye Vaas Hai' in Indu Sarkar | इंदू सरकारमधील 'ये आवाज है' नवं गाणं लाँच

इंदू सरकारमधील 'ये आवाज है' नवं गाणं लाँच

ुर भंडारकर यांच्या आगामी चित्रपट इंदु सरकारमधले 'ये आवाज है' नवं गाणं रिलीज करण्यात आले आहे. हे गाणं अभिनेत्री किर्ती कुल्हाडीवर चित्रित करण्यात आले आहे. यात किर्ती एक पत्रकार बनली आहे जी आणीबाणी विरोधात आवाज उठवते. या गाण्याला अनु मलिकने म्युझिक दिले आहे. मोनाली शर्माने या गाण्याला आवाज दिला आहे तर पुनीत शर्माने हे गाणं लिहिले आहे. किर्तीसोबत नील नितीन मुकेश, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शीबा चड्ड्ढा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. १९७५ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवर आधारित हा चित्रपट आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात 21 महिने आणीबाणी लागू केली होती.
काँग्रेस पक्षामधून या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी विरोध करण्यात येत आहे.   28 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. किर्ती पिंक चित्रपटात दिसली होती या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. इंदू सरकारचा ट्रेलर बघून ही किर्तीच्या दमदार अभिनयाची प्रशंसा होते आहे.  चित्रपटात संजय गांधींची भूमिका नील नितीन मुकेश साकारतो आहे. अनुपम खेर ही यात दमदार भूमिकेत दिसणार आहेत. याचित्रपटानंतर नील नितीन मुकेश सोहामध्ये झळकणार असल्याचे समजते आहे. नील नितीन मुकेश प्रभासच्या अपोझिट अ‍ॅक्शन करताना दिसणार असल्याचे कळते आहे ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये नील नितीन मुकेशची निगेटीव्ह भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. त्यामुळेच बॉलिवूडसोबत साऊथच्या अनेक ऑफर्स त्याला येत आहे.  

Web Title: Launch of the new song 'Ye Vaas Hai' in Indu Sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.