Latest pics :​ मम्माचे बोट धरून कुठे निघाली शाहिद कपूरची लाडकी लेक मीशा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:07 IST2017-08-01T08:37:53+5:302017-08-01T14:07:53+5:30

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लाडकी लेक मीशा कपूर कुठल्या ‘स्टार’पेक्षा कमी नाही. येत्या २६ आॅगस्टला मीशा एक ...

Latest pics: Shahid Kapoor's little girl Meisha, where was the boat carrying Mammachar? | Latest pics :​ मम्माचे बोट धरून कुठे निघाली शाहिद कपूरची लाडकी लेक मीशा?

Latest pics :​ मम्माचे बोट धरून कुठे निघाली शाहिद कपूरची लाडकी लेक मीशा?

हिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लाडकी लेक मीशा कपूर कुठल्या ‘स्टार’पेक्षा कमी नाही. येत्या २६ आॅगस्टला मीशा एक वर्षाची होतेय. सध्या मीशाच्या पहिल्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरु  आहे. आजपर्यंत मीशाला तुम्ही मीरा व शाहिदच्या कडेवर पाहिले असेल. पण आता लाडकी मीशा चालायला लागली आहे. होय, दुडूदुडू पावलांनी धावायला लागली आहे. मम्माच्या हातात हात घालून बाहेर पडू लागली आहे. विश्वास बसत नसेल, तर मीशाचे मम्मासोबतचे हे फोटो तुम्ही बघायलाच हवेत.





मीशा मम्मासोबत कारमधून उतरली आणि मम्माचे बोट धरून लुटूपुटू चालू लागली. फोटोग्राफर्स मीशाचे फोटो घेण्यासाठी सरसावले. पण बेबीवर काहीही परिणाम नाही.ती अगदी ऐटीत फोटोग्राफर्सला सामोरे गेली. कदाचित मम्मी-पप्पासोबत राहून मीशालाही आत्तापासून स्टारडमची सवय झाली असावी.





कॅमेºयांच्या क्लिकक्लिकला ती जराही घाबरली नाही. उलट तिच्या डोळ्यांत कुतूहलच दिसले. मीशाचे हे फोटो मग लगेच इंटरनेटवर व्हायरल झालेत. मीराला आधी लेकीचे फोटो व्हायरल झालेले आवडायचे नाही. पण आता तिनेही ते मान्य केले आहे. आधी मीशाचे फोटो क्लिक होताना पाहून मी अस्वस्थ व्हायचे. पण आता मला सवय झाली आहे. हा आमच्या आयुष्याचा भाग आहे, असे मीरा आताश: म्हणू लागली आहे.
तूर्तास मीशाचा पहिला वाढदिवस कसा साजरा होणार, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. पण कदाचित आपल्या वाढदिवशी मीशा देशाबाहेर असणार आहे. म्हणजेच मीशाचा वाढदिवस विदेशात साजरा करण्याचा प्लान शाहिद व मीराने आखला आहे. मीशाच्या वाढदिवसाला कदाचित आम्ही देशात नसू. तो वेळ मी कुटुंबासोबत घालवणार आहे, असे शाहिदने अलीकडे एका इव्हेंटदरम्यान सांगितले होते.

Web Title: Latest pics: Shahid Kapoor's little girl Meisha, where was the boat carrying Mammachar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.