अखेर का पापा धर्मेंद्रसमोर काहीही बोलण्याची हिम्मत करीत नाही सनी देओल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 16:27 IST2017-09-30T10:57:04+5:302017-09-30T16:27:04+5:30

२००७ मध्ये आलेला ‘अपने’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल लीड ...

Lastly, do not dare to talk to Dharmendra before Sunny Deol? | अखेर का पापा धर्मेंद्रसमोर काहीही बोलण्याची हिम्मत करीत नाही सनी देओल?

अखेर का पापा धर्मेंद्रसमोर काहीही बोलण्याची हिम्मत करीत नाही सनी देओल?

०७ मध्ये आलेला ‘अपने’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल लीड रोलमध्ये होते. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, सनी देओलने चित्रपटात अशा मुलाची भूमिका निभावली होती, जो त्याच्या वडिलांपासून नेहमी दूर राहतो. चित्रपटात असे काही घडते ज्यामुळे वडील धर्मेंद्र मुलगा सनीवर नाखूश होतात अन् त्याला नेहमीच इग्नोर करतात. या चित्रपटाप्रमाणेच सनी आणि धर्मेंद्र यांची रिअल लाइफ आहे. होय, सनी पापा धर्मेंद्रच्या फारसा क्लोज नाही, तर सनीचा लहान भाऊ बॉबी देओल त्याच्या वडिलांच्या अधिक जवळ आहे. मात्र यामागे काय कारण असावे? 

बॉबीने एका मुलाखतीत सांगिंतले होते की, जेव्हा माझ्याकडे तब्बल चार वर्षे काहीही काम नव्हते, तेव्हा पापा धर्मेंद्रनी मला आधार दिला. तर सनी देओलने म्हटले होते की, मी लहानपणापासून पापा धर्मेंद्र यांना खूप घाबरत असून, ती भीती अजूनही कायम आहे. सनीने म्हटले होते की, जेव्हा मी काही चुकीचे करायला जातो तेव्हा वडिलांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात फिरत असतात. त्यामुळे मी चुकीच्या मार्गावरून परततो अन् पुन्हा चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो. 



पुढे बोलताना सनी देओलने म्हटले होते की, आजही मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही. मी माझ्या वडिलांचा खूप आदर करतो. तेच माझे सर्वस्व आहेत. वास्तविक सनी आणि धर्मेंद्र यांचे नाते सुरुवातीपासूनच खूप वेगळे आहे. सनी देओलने वडील धर्मेंद्रबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र अजूनही तो वडिलांच्या तुलनेत स्वत:चा चांगला अभिनेता समजत नाही. असो, आता हे तिघे पुन्हा एकदा ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटातून परतत आहेत. या व्यतिरिक्त धर्मेंद्रचा नातू करण देओलही लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: Lastly, do not dare to talk to Dharmendra before Sunny Deol?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.