‘जालिमा’ला पसंत आला ‘लैला’चा अंदाज; माहिरा खानने केले सनी लिओनीचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 15:56 IST2017-02-05T10:18:15+5:302017-02-05T15:56:22+5:30

शाहरूख खान याच्या ‘रईस’मध्ये लैला मै लैला या गाण्यावर आयटम नंबर करून प्रेक्षकांची मने जिंकणाºया सनी लिओनीचा हा अंदाज ...

Laila's version of 'Jalima' liked; Mahiri Khan praised Sunny Leone | ‘जालिमा’ला पसंत आला ‘लैला’चा अंदाज; माहिरा खानने केले सनी लिओनीचे कौतुक

‘जालिमा’ला पसंत आला ‘लैला’चा अंदाज; माहिरा खानने केले सनी लिओनीचे कौतुक

हरूख खान याच्या ‘रईस’मध्ये लैला मै लैला या गाण्यावर आयटम नंबर करून प्रेक्षकांची मने जिंकणाºया सनी लिओनीचा हा अंदाज ‘रईस’मधील जालिमा अर्थात माहिरा खान हिला खूपच भावला आहे. त्यामुळेच ती सनीचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. 

‘रईस’मध्ये शाहरूखबरोबर मुख्य भूमिकेत असलेल्या माहिरा खान हिला पाकिस्तानी कलाकारांवर असलेल्या बॅनमुळे भारतात तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाचे सेलिब्रेशन करता आले नाही. मात्र प्रमोशननिमित्त शाहरूखसोबत प्रत्येक ठिकाणी झळकलेल्या सनीचे मात्र तिला चांगलेच कौतुक वाटत आहे. कारण तिच्या आयटम नंबरमुळेच सिनेमाला फायदा झाला असून, दरदिवसाला कलेक्शनच्या आकड्यांमध्ये भर पडत असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता हा सिनेमा पाकिस्तानातही लवकरच रिलिज होणार असल्याने माहिरा प्रचंड खूश आहे. 



खरं तर बॉलिवूडमध्ये नेहमीच सिनेमाच्या सेट आणि कॅट फाइटच्या बातम्या समोर येत असतात. मात्र शाहरूखच्या ‘रईस’मधील दोन्ही अभिनेत्री एकमेकींचे कौतुक करीत असल्याने हा दुर्मिळ योग समजला जात आहे. या कौतुकाची सुरुवात सनीने केली असून, माहिरा खूपच प्रेमळ आणि सुंदर असल्याचे म्हटले. मग काय माहिरानेदेखील सनीचे कौतुक करण्याची संधी सोडली नाही. 
{{{{twitter_post_id####}}}}

नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरेंसिंगच्या माध्यमातून माहिराने भारतीय प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी शाहरूख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीही उपस्थित होते. यावेळी माहिराने म्हटले की, ‘मला सनी लिओनीची बेबी डॉल खूपच आवडतेय. आम्ही दोघी एयरपोर्टवर भेटलो होतो, त्यावेळेस आम्ही एकमेकींशी चर्चाही केली. ती खूपच सुंदर आहे. माझ्या मते, लैला मैं लैलामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. 
{{{{twitter_post_id####}}}}

माहिराच्या या कौतुकाला सनीनेही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले. होय, एयरपोर्टवरील माहिरासोबतची भेट मला आठवतेय. ती खूप सुंदर असून, तिला भेटून मला खूपच आनंद झाला होता. सिनेमात सनीने आयटम नंबर केला आहे, तर माहिरा शाहरूखच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.

माहिरा खान पाकिस्तानातील चर्चेतील अभिनेत्री आहे. टीव्ही शो ‘हमसफर’मधून ती घराघरांत पोहचली असून, याच शोने तिला सुपरहिटचा दर्जाही मिळवून दिला आहे. याविषयी माहिराने सांगितले की, तिच्या परिवाराला शाहरूख खानचा अभिनय खूपच आवडतो. त्याचबरोबर आता ते सनीचेही फॅन झाले आहेत. सनीने केलेले कौतुक आमच्यातील केमिस्ट्री दर्शविणारे असल्याचेही तिने सांगितले. माहिराचा हा पहिलाच बॉलिवूडपट असून, पाकिस्तानी कलाकारांवर बॅन लावल्याने तिला या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होता आले नाही. त्याचबरोबर सिनेमाच्या सक्सेस पार्टीपासूनही तिला दूर ठेवले गेले. आता हा सिनेमा पाकिस्तानात रिलिज होणार असल्याने ती आनंदी आहे. 

Web Title: Laila's version of 'Jalima' liked; Mahiri Khan praised Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.