लैला मै लैला : सनी लिओनचा रईसमधील हॉट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 19:29 IST2016-12-21T18:41:49+5:302016-12-21T19:29:23+5:30
Raees : sunny leone Laila Main Laila released ; रईस’ च्या ट्रेलरमध्ये सनी लिओनच्या आयटम साँगची केवळ एक झलक दाखविण्यात आली होती. सनीचा ‘रईस’मधील हा डान्स कसा असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

लैला मै लैला : सनी लिओनचा रईसमधील हॉट अंदाज
‘लैला मै लैला’ या गाण्याच्या रिलीजपूर्वी शाहरुख व सनी लिओन यांनी ट्विट करून चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. शाहरुखने ‘कब आयेगी मेरी जाने बहार’ या गाण्याचा छोटासा व्हिडीओ शेअर केला त्यावर ‘मै आ गयी’ असे उत्तर सनीने दिले. दिग्दर्शक राहुल ढोलकियाने देखील दोघांच्या संभाषणात उडी घेत उत्सुकता वाढविण्याचा प्रयत्न केला, यावर सनीने धन्यवाद असे लिहून उत्तर दिले.
या गाण्यात सनीचा हॉट अंदाज नजर वेधून घेणारा आहे. या गाण्याचा रिमेक राम संपत यांनी केला असून, हे गाणे पवनी पांडे हिने गायले आहे.
‘रईस’ च्या ट्रेलरमध्ये सनी लिओनच्या आयटम साँगची केवळ एक झलक दाखविण्यात आली होती. सनीचा ‘रईस’मधील हा डान्स कसा असेल हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामुळेच ख्रिसमस व न्यू इअर हे दोन महत्त्वाचे फेस्टीव्हल डोळ्यासमोर ठेवून एका सबअर्ब हॉटलने सनी लिओनला ४ कोटी रुपये देत ‘लैला मै लैला’ या गाण्यावर हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी लाईव्ह परफॉर्मन्स करावा अशी आॅफर दिली होती. आता या गाण्याचा व्हिडीओ रिलीज करण्यात आल्याने चाहत्यांना सनीचा डान्स पाहता येणार आहे.
रईसचा ट्रेलर लाँच झाल्यापासून यूट्युबवर सुमारे २७ लाख लोकांनी पाहिला आहे. २०१६ साली आतापर्यंत सर्वाधिक पाहण्यात आलेला हा ट्रेलर ठरला आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी व माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असणारा रईस हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
पहा : रईसमधील लैला मै लैला हे गाणे...