कार्तिक आर्यनच्या 'नागजिला'मध्ये 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची एन्ट्री?, पण तिची टीम म्हणतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:23 IST2025-11-10T13:23:11+5:302025-11-10T13:23:51+5:30
Kartik Aaryan's Naagzilla Movie : कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा 'नागजिला' सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवरील पूजा करतानाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. आता या चित्रपटातील अभिनेत्रीसंदर्भात बातमी समोर येत आहे.

कार्तिक आर्यनच्या 'नागजिला'मध्ये 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीची एन्ट्री?, पण तिची टीम म्हणतेय...
कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा 'नागजिला' सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेटवरील पूजा करतानाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. आता या चित्रपटातील अभिनेत्रीसंदर्भात बातमी समोर येत आहे.
'भूल भुलैया ३'च्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन सुपरनॅचरल थ्रिलर 'नागजिला' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केलं आहे. यात कार्तिक इच्छाधारी नागाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा ऐकायला मिळत आहे की, निर्मात्यांची या चित्रपटासाठी मुख्य भूमिकेसाठीची शोध मोहीम पूर्ण झाली आहे. पण आता असे वृत्त समोर येत आहे की, ज्या अभिनेत्रीचं नाव नागजिला सिनेमासाठी चर्चेत होतं, तिला अद्याप या सिनेमाची ऑफर न मिळाल्याचं समोर आलं आहे.
प्रतिभा रांटा म्हणाली...
'नागजिला' चित्रपटासाठी अभिनेत्रीचा शोध अद्याप पूर्ण झालेला नाही. एका रिपोर्टनुसार, यापूर्वी अभिनेत्री सान्या मल्होत्राला या चित्रपटात कास्ट करण्याबद्दल चर्चा सुरू होती, पण ते जमले नाही. त्यानंतर निर्मात्यांनी अभिनेत्रीचा शोध सुरू केला. याचदरम्यान बातम्या आल्या की, 'लापता लेडीज' चित्रपटातील अभिनेत्री प्रतिभा रांटाला साईन करण्यात आले आहे. मात्र, प्रतिभाच्या टीमनुसार, या बातम्या अफवा आहेत आणि अद्याप प्रतिभाशी याबद्दल संपर्क साधलेला नाही. 'नागजिला'साठी तिला कोणतीही ऑफर मिळालेली नाही.
'नागजिला' कधी येणार भेटीला?
प्रतिभा पुढील वर्षाच्या सुरुवातीला निर्माते दिनेश विजन यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. आता 'नागजिला'मध्ये कार्तिकची अभिनेत्री कोण असेल हे पाहणे रंजक ठरेल. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.