‘कीया’च्या इच्छेवर ‘का’ ची कमांड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 22:09 IST2016-02-25T05:09:45+5:302016-02-24T22:09:45+5:30

अर्जुन कपूर आणि करिना कपूर सध्या ‘की अँण्ड का’ या चित्रपटामुळे खुपच चर्चेत आहेत. 

'Kya' will command 'Kai'! | ‘कीया’च्या इच्छेवर ‘का’ ची कमांड !

‘कीया’च्या इच्छेवर ‘का’ ची कमांड !

्जुन कपूर आणि करिना कपूर सध्या ‘की अँण्ड का’ या चित्रपटामुळे खुपच चर्चेत आहेत. त्यातील गाणे आणि एकंदरितच चित्रपटाची कथा अत्यंत लोकप्रिय आणि आकर्षक वाटत आहे. आर.बल्की यांच्या या चित्रपटातील ‘हाय हिल्स’ या गाण्यानंतर आता ‘जी हुजूरी’ हे गाणे रिलीज होणार आहे. यात पारंपारिक विचारसरणीला तडा देऊन नवा क्रांतीकारी बदल करण्याच्या मार्गावर आर. बल्की दिसत आहेत.

अर्जुनने यात घर सांभाळणाºया पतीची भूमिका केलीय तर करिनाने करीअर ओरिएंटेड महिलेची भूमिका केली आहे. करिनाला जे पाहिजे ते तो बनवून देत असतो. एकदम लव्हिंग हजबंड आणि बिनधास्त तिचा पती दाखवण्यात आला आहे. चित्रपट १ एप्रिल रोजी रिलीज होणार असून यात अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन देखील पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत. 

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_video_id####}}}}






 

Web Title: 'Kya' will command 'Kai'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.