क्रिश : ४ मध्ये हृतिकसोबत असणार ही नायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 20:12 IST2016-12-04T20:12:44+5:302016-12-04T20:12:44+5:30
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘क्रिश ४’ मध्ये अभिनेत्री कोण असेल याविषयी अनेक तर्क लावण्यात येत आहेत. मात्र, ...

क्रिश : ४ मध्ये हृतिकसोबत असणार ही नायिका
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा आगामी चित्रपट ‘क्रिश ४’ मध्ये अभिनेत्री कोण असेल याविषयी अनेक तर्क लावण्यात येत आहेत. मात्र, हृतिक रोशनने एका कोड्यातून ‘क्रिश ४’ ची नायिका कोण असेल याची माहिती दिली आहे. यामी गौतमला ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने हे रहस्य उलगडले.
गणेशोत्सवानंतर राकेश रोशन यांनी ‘क्रिश ४’ ची घोषणा केली होती. यात हृतिक सुपरस्टारची भूमिका करणार हे निश्चित होतेच, मात्र चित्रपटाची अभिनेत्री कोण असेल यासाठी बॉलिवूडमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. क्रिश सिरीजमध्ये प्रिती झिंटा व प्रियांका चोप्रा यांनी हृतिकच्या अपोझिट भूमिका साकारल्या आहेत. यामुळे त्यांच्या सुंदरतेला तोड असणारी नायिका क्रिशच्या पुढील भागात असेल असा अंदाज लावण्यात येत होता. आता हे रहस्य स्वत: हृतिकने यामी गौतमला दिलेल्या शुभेच्छेतून उलगडले आहे.
हृतिक रोशनच्या आगामी ‘काबील’ या चित्रपटातील को-स्टार यामी गौतमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हृतिकने लिहले, ‘‘वाढदिवसाच्या शुभेच्छा यामी! तू याच प्रकारे नेहमी चमकत राहा, तुझ्या डोळ्याची चमक कधीच कमी होऊ नये! आपण लवकरच सुपरहिरोजमध्ये काम करू !’’
Happy birthday @yamigautam shine bright today and forever:) may d wonder in ur eyes never diminish. N in d next let's play superheroes! Love
— Hrithik Roshan (@iHrithik) November 28, 2016 "
Happy birthday @yamigautam shine bright today and forever:) may d wonder in ur eyes never diminish. N in d next let's play superheroes! Love
— Hrithik Roshan (@iHrithik) November 28, 2016
यावर यामीने खूप खूप धन्यवाद, आपण नक्कीच सोबत काम करू असे उत्तर दिले.
हृतिक रोशनने ज्या सुपरहिरोचा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये केला आहे तो सुपरहिरो क्रिश आहे हे सांगण्याची फारशी गरज नाही. या चित्रपटाच्या प्रि-प्रोडक्शनला सुरुवात झाली असल्याची माहिती खुद्द राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. यावरून आगामी ‘क्रिश ४’ मध्ये यामी नायिकेच्या भूमिकेत दिसेल असे मानले जात आहे.
हृतिक - यामी यांची जोडी असलेल्या संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यात हृतिक व यामी यांनी अंध व्यक्तींच्या भूमिका साकारल्या आहेत.