'माझं ठरलं! नागपूरात जाऊन RSSमध्ये सामील होणार', KRKचे नवे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 02:52 PM2022-09-29T14:52:54+5:302022-09-29T14:54:10+5:30

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत नेहमी असणाऱ्या KRKने RSSमध्ये सामील होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

KRK's new tweet, 'I decided! Going to Nagpur to join RSS' | 'माझं ठरलं! नागपूरात जाऊन RSSमध्ये सामील होणार', KRKचे नवे ट्विट चर्चेत

'माझं ठरलं! नागपूरात जाऊन RSSमध्ये सामील होणार', KRKचे नवे ट्विट चर्चेत

googlenewsNext

KRK in RSS: बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक व अभिनेता कमाल आर खान (Kamaal R Khan) अर्थात केआरके (KRK) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वादग्रस्त ट्विटमुळे केआरके नेहमी चर्चेत असतो. एका वादग्रस्त ट्वीटप्रकरणी काही दिवसांपूर्वीच केआरकेला तुरुंगात जावे लागले होते. आता परत एका ट्विटमुळे केआरके पुन्हा चर्चेत आला आहे.

KRK आरएसएसमध्ये सामील होणार 
केआरकेने ट्विटद्वारे आरएसएसमध्ये सामील होणार असल्याचे पक्के केले आहे. 'माझं ठरलंय. लवकरच मी नागपूरला जाऊन अधिकृतपणे RSS मध्ये सामील होणार आहे.' असे ट्विट त्याने केले आहे. त्याच्या या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'तुम्ही फक्त मूव्ही रिव्ह्यूमध्येच ठीक आहात.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'आम्हाला तिथेही रिव्ह्यू ऐकायला आवडेल.' 

मोहन भागवतांकडे साकडे
काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटल्यानंतर केआरकेने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSमध्ये सामील होण्याची इच्छाही बोलून दाखवली. यासाठी त्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटद्वारे साकडे घातले होते. आता त्याने आरएसएसमध्ये सामील होण्यासाठी नागपूरला जाणार असल्याचे म्हटले आहे.
 

'विक्रम वेधा' केआरकेचा अखेरचा चित्रपट


केआरकेने ट्विटरवरुन चित्रपटाचे समीक्षण बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. 'विक्रम वेधा' हा त्याचा शेवटचा चित्रपट असेल. त्याने ट्विट केले होते की, 'माझ्यासमोर दोनच पर्याय होते. पहिला म्हणजे, मुंबई सोडली पाहिजे आणि दुसरा म्हणजे चित्रपटांचे समीक्षण सोडले पाहिजे. त्यामुळे मी दुसरा पर्याय निवडला, कारण माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी बॉलीवूडच्या लोकांना मुंबईत मोठा राजकीय पाठिंबा मिळत आहे."

Web Title: KRK's new tweet, 'I decided! Going to Nagpur to join RSS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.