क्रिती सनॉनच्या पहिल्याच फॅशन शोदरम्यान घडलं होतं असं काही..., ढसाढसा रडली... मग आईनेच दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:51 AM2023-07-27T10:51:09+5:302023-07-27T12:04:41+5:30

क्रितीच्या कुटुंबियातील कोणीच या चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीये. तिचे वडील हे सी.ए आहेत तर आई प्रोफेसर आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे तिच्यासाठी सोपे नव्हते.

kriti sanon birthday career struggle life films family affair net worth unknown facts | क्रिती सनॉनच्या पहिल्याच फॅशन शोदरम्यान घडलं होतं असं काही..., ढसाढसा रडली... मग आईनेच दिला आधार

क्रिती सनॉनच्या पहिल्याच फॅशन शोदरम्यान घडलं होतं असं काही..., ढसाढसा रडली... मग आईनेच दिला आधार

googlenewsNext

‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रिती सॅननचा आज वाढदिवस असून तिने खूपच कमी कालावधीच बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. क्रितीच्या कुटुंबियातील कोणीच या चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीये. तिचे वडील हे सी.ए आहेत तर आई प्रोफेसर आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे तिच्यासाठी सोपे नव्हते. 

अनेकांना माहीत नसेल पण कृतिचं सिनेमातील करिअर एका तेलगु सिनेमातून झालं होतं. या सिनेमात तिचा हिरो महेश बाबू होता. पुढे तिने 'हिरोपंती' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे. कृति ही खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. 

क्रिती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती, तिने  नोएडातील कॉलेजमधून इंजिनीअरिंग केलं आहे. आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्याच्या रॅम्प वॉकशी संबंधित एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. क्रितीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या पहिल्या रॅम्प वॉकमध्ये तिच्याकडून काही चूक झाली होती, त्यानंतर तिला सगळ्यांसमोर खूप फटकारलं गेलं होतं. यानंतर क्रिती रडू लागली. आईने तिला समजावून सांगितलं यानंतर तिने स्व:तला कणखर केलं.

क्रितीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यापैकी 'बरेली की बर्फी' सुपरहिट ठरला होता. अभिनेत्रीचा कार्तिक आर्यनसोबतचा 'लुका छुपी'ही प्रेक्षकांना खूप आवडला होता. याशिवाय क्रिती 'हाऊसफुल', 'दिलवाले', 'बच्चन पांडे', 'मिमी' 'भेडिया', 'शहजादा'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. अलीकडेच अभिनेत्रीचा 'आदिपुरुष' हा पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित झाला. क्रितीने या चित्रपटात सीतेची भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट वादात सापडला.
दरम्यान क्रितीचे अनेक मोठे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. ती पुन्हा एकदा 'गणपत'मध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याचवेळी शाहिद कपूरसोबतचा तिचा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: kriti sanon birthday career struggle life films family affair net worth unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.