Koffee With Karan 8: ' आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनच्या मुख्य भूमिकेवरुन आदित्य कपूर स्पष्टच बोलला, म्हणाला "आशिकी २ मध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:41 AM2023-12-14T11:41:08+5:302023-12-14T11:41:51+5:30

'कॉफी विथ करण'मध्ये आदित्यने अनन्या पांडे आणि 'आशिकी ३'बद्दलही भाष्य केलं.

Koffee With Karan 8 aditya roy kapur break silence on kartik aaryan in aashiqui 3 | Koffee With Karan 8: ' आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनच्या मुख्य भूमिकेवरुन आदित्य कपूर स्पष्टच बोलला, म्हणाला "आशिकी २ मध्ये..."

Koffee With Karan 8: ' आशिकी ३' मध्ये कार्तिक आर्यनच्या मुख्य भूमिकेवरुन आदित्य कपूर स्पष्टच बोलला, म्हणाला "आशिकी २ मध्ये..."

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण ८' हा लोकप्रिय शो आहे. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर यांनी हजेरी लावली होती. करण जोहरच्या खोचक प्रश्नांना आदित्य आणि अर्जुनने अगदी दिलखुलास पद्धतीने उत्तरं दिली. 'कॉफी विथ करण'मध्ये आदित्यने अनन्या पांडे आणि आशिकी ३बद्दलही भाष्य केलं. 

अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलेल्या आदित्यने २००९ साली लंडन ड्रीम्स या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पण, २०१३ साली प्रदर्शित झालेल्या आशिकी २मुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. १९९० मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या आशिकी या चित्रपटाचा हा सिक्वल होता. आशिकीप्रमाणेच आशिकी २देखील सुपरहिट ठरला होता. आदित्यबरोबर या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. 'आशिकी २'नंतर आता 'आशिकी ३'च्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु, 'आशिकी ३'मध्ये आदित्य कपूर नाही तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'आशिकी ३'मध्ये कार्तिक आर्यनला घेण्यावरुन आता आदित्यने मौन सोडलं आहे. 

कॉफी विथ करणमध्ये करणने आदित्यला "जेव्हा कोणीतरी दुसरं तुमच्या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करतं, तेव्हा कसं वाटतं?" असा प्रश्न विचारलं. त्यावर उत्तर देत आदित्य म्हणाला, "'आशिकी २'मध्ये मी साकारलेल्या पात्राचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ते पात्र परत येण्याची कोणतीच संधी नव्हती." आदित्यच्या या उत्तरावर अर्जुन म्हणतो की त्यानंतर मग तो नाईट मॅनेजर बनला. पुढे आदित्य मजेशीर पद्धतीने म्हणाला, "मग आता मी परत कसा येणार? माझा आत्मा परत येऊ शकतो. आणि कार्तिकला त्रास देऊ शकतो."

दरम्यान, आदित्य रॉय कपूर गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडेला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण, दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबाबत थेट बोलणं टाळलं आहे.  

Web Title: Koffee With Karan 8 aditya roy kapur break silence on kartik aaryan in aashiqui 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.