अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरने करणच्या कार्यक्रमात सांगितले त्यांचे डेटिंग सिक्रेट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 21:00 IST2018-11-19T21:00:00+5:302018-11-19T21:00:02+5:30
अर्जुन आणि जान्हवी यांचे हेच ट्युनिंग आता प्रेक्षकांना कॉफी विथ करण या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि जान्हवीवर चित्रीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूरने करणच्या कार्यक्रमात सांगितले त्यांचे डेटिंग सिक्रेट्स
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'चा सहावा सीजन प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात आजवर आपल्याला दीपिका पादुकोण-आलिया भट्ट, रणवीर सिंग-अक्षय कुमार, सैफ अली खान-सारा अली खान यांच्या जोड्या पाहायला मिळाल्या आहेत. या सगळ्यांनी कार्यक्रमात येऊन करणसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आहेत. आता यांच्यानंतर या कार्यक्रमात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर हजेरी लावणार आहेत.
अर्जुन आणि जान्हवी यांच्यात निर्माण झालेले बॉण्डिंग गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या फॅन्सना पाहायला मिळत आहे. ते दोघे सावत्र भावंडं असली तरी त्यांच्यात खूपच छान ट्युनिंग असल्याचे दिसून येत आहे. जान्हवीच्या बॉलिवूडमधील पदार्पणाच्या वेळी एका मोठ्या भावाप्रमाणे अर्जुन तिला प्रोटेक्ट करताना दिसला आहे. अर्जुन आणि जान्हवी यांचे हेच ट्युनिंग आता प्रेक्षकांना कॉफी विथ करण या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि जान्हवीवर चित्रीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या प्रोमोत जान्हवी आणि अर्जुन त्यांचे डेटिंग सिक्रेट्स करणला सांगताना दिसत आहेत.
जान्हवीच्या धडक या पहिल्या चित्रपटात तिची जोडी इशान खट्टरसोबत झळकली होती. या चित्रपटाच्यावेळी त्या दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. इशान आणि जान्हवीच्या नात्यावर आजवर जान्हवीने मौन राखणेच पसंत केले होते. पण आता कॉफी विथ करण या कार्यक्रमात पहिल्यांदाच ती त्यांचे खरे नाते काय आहे याविषयी सांगणार आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर जान्हवीनंतर आता अर्जुन त्याच्या आणि मलाईका अरोराच्या नात्याविषयी या कार्यक्रमात काही बोलतो का याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
'कॉफी विथ करण' हा करण जोहरचा कार्यक्रम पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठे कलाकार येऊन अनेक खुलासे करून गेले आहेत. त्यामुळे या शोच्या प्रत्येक सीझनची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात.
Catch the brother-sister duo fight over the hamper on the #KoffeeWithKaran couch! #KoffeeWithArjun#KoffeeWithJanhvipic.twitter.com/7rykVwFd6A
— Star World (@StarWorldIndia) November 18, 2018