Koffee With Karan Season 5 पुन्हा एकदा येणार आलिया भट्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2017 14:47 IST2017-01-26T06:39:06+5:302017-01-26T14:47:21+5:30
बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता वरुण धवन आणि बॉलिवूडमधील चुलबुली गर्ल आलिया भट्ट लवकरच आपल्याला कॉफि विथ करण ...

Koffee With Karan Season 5 पुन्हा एकदा येणार आलिया भट्ट
करणच्या कॉफि विथ करणच्या पाचव्या सीझनचे ओपनिंग आलियानेच केले होते. यावेळी ती शाहरुख खानच्या डिअर जिंदगी या चित्रपटच्या प्रमोशनसाठी आली होती. आता ती तिचा आगामी चित्रपट बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येण्यार असल्याचे कळतेय. आलिया कॉफी विथ करणच्या चौथा सीझनमध्ये ही दोनदा दिसली होती. पहिल्यांदा करण जोहर दिग्दर्शित स्टुडंट ऑफ द इअरच्या प्रमोशनसाठी आली होती तर दुसऱ्यांदा परिणीती चोप्राबरोबर दिसली होती.
आलिया आणि वरुणने याआधी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 2014मध्ये आलेला हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात ही दोघांची हिट केमिस्ट्री दिसली होती. यानंतर पु्न्हा एकदा बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटा दोघे एकत्र दिसणार आहेत.
बद्रीनाथ की दुल्हनिया हा चित्रपट रोमाँटिक आणि कॉमेडी चित्रपट आहे हा चित्रपट वरुणच्या मध्ये आलेल्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपट पेक्षा अगदी वेगळा असल्याचे वरुणचे म्हणणे आहे.बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. बद्रीनाथ हा झाशीत राहणार एक मुलगा असतो. याचित्रपटाची कथा बद्रीनाथ त्यांची दुल्हनिया आणि या दोघांना करावा लागणाऱ्या संकटांचा सामना याची भवती फिरते.
सलमान खान बरोबर येणाऱ्या जुडवाच्या सीक्वलमध्ये काम करण्याऱ्याबाबत वरुण धवन खपू उत्साहित आहे. याचित्रपटाची पटकथा लिहिण्याचे काम सध्या सुरु आहे. जुडवा मध्ये वरुण धवन आपल्याला एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.