कोरोना काळात भारत सोडून दुबईत का राहतोय संजय दत्त ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:51 IST2021-06-04T15:41:35+5:302021-06-04T15:51:15+5:30
दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवणारा संजय दत्तहा पहिला बॉलिवूड अभिनेता बनला आहे. मुळात गोल्ड व्हिसा मिळाल्यामुळे आता संजय दत्तला दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी मिळाली आहे.

कोरोना काळात भारत सोडून दुबईत का राहतोय संजय दत्त ?
संजय दत्त गेल्या काही महिन्यांपासून भारतात नाही तर दुबईत राहत आहे. नुकतेच संजय दत्तचे कुटुंब बहुतेक वेळा दुबईमध्ये राहते. त्यामुळे उपचारादरम्यानही अधून मधून मान्यता आणि मुलांना भेटण्यासाठी दुबईला ये जा करायचा. लॉकडाऊनमध्ये मान्यता दत्त मुलांसह दुबईमध्ये अडकली. त्यामुळे दुबईमध्येच मुलांचे ऑनलाईन शिक्षणही सुरु आहे. मुळात मान्यताच्या वडिलांचा दुबईमध्ये बिझनेस होता.
अनेकदा कामानिमित्त मान्यता दुबईमध्येच असायची. तसेच लॉकडाऊनमध्ये मान्यता आणि मुलं दुबईत असल्यामुळे संजय दत्तही इकडे एकटाच पडला होता. तसेही संजय दत्तदेखील त्याच्या कामानिमित्त अनेकदा दुबईत ये जा करत असायचा. आता तर तो कुटुंबासह तिथेच राहत आहे. नुकताच संजय दत्तला युएईचा गोल्डन व्हिसा देण्यात आला आहे.
दुबईचा गोल्डन व्हिसा मिळवणारा संजय दत्तहा पहिला बॉलिवूड अभिनेता बनला आहे. मुळात गोल्ड व्हिसा मिळाल्यामुळे आता संजय दत्तला दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी मिळाली आहे. गोल्डन व्हिसा मिळाल्यामुळे दुबईमधल्या नागरिकांप्रमाणेच त्यालाही अधिकार मिळाले आहेत. तिथे राहून तो आता व्यवसायही करु शकतो.
संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त अनेकदा दुबईमधले खास फोटो शेअर करत असते. दुबईमध्ये आलिशान आयुष ती जगते. तिच्या आलिशान घरावरुन तिच्या लाइफस्टाइलही आलिशान असल्याचे समजतं. सोशल मीडियावर नजर टाकल्यास संजय दत्तचे कुटुंबासह खास क्षणांचे फोटो पाहायला मिळतात. या फोटोंना चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असतात.
संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. अशावेळी त्याला पत्नी मान्यता दत्तनेच खंबीरपणे साथ दिली. संजय तुरूंगात असतांना, मान्यता त्याला भेटायला जायची. त्याला धीर द्यायची. संजय दत्तने २००८ मध्ये मान्यताशी लग्न (Marriage) केले होते. या दोघांचे गोव्यात लग्न झाले होते.
मान्यतासह संजय दत्तचे हे तिसरे लग्न आहे. दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते.मान्यता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. संजयचे सारे काम तीच सांभाळते. मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख असे आहे.