जाणून घ्या वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत केव्हा करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 14:06 IST2017-07-27T08:36:13+5:302017-07-27T14:06:13+5:30

नेहमीच आपण आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. जसे की, सध्या तो कोणाच्या प्रेमात पडला आहे? तो ...

Know when Varun Dhawan married to Nataly Dalal? | जाणून घ्या वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत केव्हा करणार लग्न?

जाणून घ्या वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत केव्हा करणार लग्न?

हमीच आपण आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. जसे की, सध्या तो कोणाच्या प्रेमात पडला आहे? तो केव्हा लग्न करणार आहे? आदी. असो, हे सांगण्याचे कारण म्हणजे आज आम्ही तुमच्या फेव्हरेट अभिनेता वरुण धवन याच्या लग्नाविषयी सांगणार आहोत. वरुण कोणाबरोबर लग्न करणार हे आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितले आहे; मात्र तो केव्हा लग्न करणार अन् त्याला त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिच्याविषयी काय वाटते? या प्रश्नांचा आज आम्ही उलगडा करणार आहोत. 

वरुण नुकताच नेहा धुपियाचा शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये गेला होता. याठिकाणी त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. नेहाने जेव्हा वरुणला गर्लफ्रेंड नताशा दलालविषयी विचारले तेव्हा वरुणने एक सुंदर स्माइल देत नेहाच्या प्रश्नाचे उत्तर दिले. वरुणने म्हटले की, हो, मी हे मान्य करतो की, नताशाबरोबर मी रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र हे मी कधीच कोणाला सांगत नाही. कारण मला नताशाला इंडस्ट्री आणि मीडियापासून दूर ठेवायचे आहे. मी तिच्याविषयी अधिक काही बोलत नाही, कारण मीडियामध्ये कुठल्या गोष्टीचा कसा अर्थ काढला जाईल हे सांगणे मुश्किल असते. खरं तर मी माझ्या व्यक्तिगत जीवनात कोणाचाही हस्तक्षेप पसंत करीत नाही. कारण मी खूपच सेंटी आहे. जेव्हा मी माझे काम पूर्ण करून घरी पोहोचतो तेव्हा मी रिअल लाइफ जगतो. 



त्यानंतर नेहा धुपियाने वरुणला विचारले की, ‘तू नताशाबरोबर लग्न करणार आहेस काय? या प्रश्नाचे उत्तर देताना वरुणने म्हटले की, ‘याबाबत आम्ही अद्यापपर्यंत विचार केलेला नाही. कधी-कधी तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाबरोबर तरी जोडले जाता. माझ्या मते हीच तुमच्यासाठी महत्त्वाची बाब असते. कारण तोच क्षण तुमच्या आयुष्यात सर्व काही बदल घडवून आणतो. असो, वरुणचे हे बिनधास्त उत्तरे ऐकून त्याच्या चाहत्यांना नक्कीच त्याच्या मॅरेज लाइफविषयी जाणून घेता आले. खरं तर वरुणच्या लग्नाला अजून बराच अवधी आहे. कारण त्याने बरेचसे चित्रपट करावेत, प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करावे, हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. 

Web Title: Know when Varun Dhawan married to Nataly Dalal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.