KKBKKJ Box Office: 'किसी का भाई किसी की जान'चा बॉक्स ऑफिसवरील खेळ खल्लास! आठव्या दिवशी केली सर्वात कमी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:28 AM2023-04-29T11:28:19+5:302023-04-29T12:10:20+5:30

शुक्रवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली आहे.

kisi ka bhai kisi ki jaan box office collection day 8 salman khan pooja hegde movie friday indian box office collection | KKBKKJ Box Office: 'किसी का भाई किसी की जान'चा बॉक्स ऑफिसवरील खेळ खल्लास! आठव्या दिवशी केली सर्वात कमी कमाई

KKBKKJ Box Office: 'किसी का भाई किसी की जान'चा बॉक्स ऑफिसवरील खेळ खल्लास! आठव्या दिवशी केली सर्वात कमी कमाई

googlenewsNext

ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला सलमान खानचा मल्टीस्टारर चित्रपट किसी का भाई किसी की जान सर्वत्र चर्चेत आहे. फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये ही भाईजान त्याच्या चित्रपटाच्या गाण्यांवर डान्स करताना दिसला, तर मुलाखतीत तो चित्रपटाबद्दल भरभरुन बोलताना दिसला. मात्र चित्रपटाबद्दल बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचे झाले तर एका आठवड्यानंतरही फारशी काही कमाई केलेली नाही. सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, जिथे चित्रपटाने आठवड्यातील सर्वात कमी गल्ला जमावला आहे. तर शुक्रवारी चित्रपटाचा आकडा धक्का देणार आहे. जाणून घेऊया सलमान खानच्या चित्रपटाने आठव्या दिवशी किती कमाई केली?

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, एका आठवड्यानंतरही चित्रपटाचा आकडा चाहत्यांना हैराण करणार आहेत. सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, जिथे चित्रपटाने आठवड्यातील सर्वात कमी कमाई केली, तर शुक्रवारी चित्रपटाचा आकडा धक्का देणार आहे. 

सातव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आणि केवळ 3.5 कोटींचा व्यवसाय केला. त्याच वेळी, चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे आकडेही आले आहेत, जे आणखी निराशाजनक आहेत. खरं तर, आठव्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला आणि खूप कमी कमाई केली.  'किसी का भाई किसी की जान'ने आठव्या दिवशी 2 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, भूमिका चावला, विजेंदर सिंग आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पलक तिवारी दिसत आहेत.
 

Web Title: kisi ka bhai kisi ki jaan box office collection day 8 salman khan pooja hegde movie friday indian box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.