​मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार बनले होते करीम अब्दुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 16:13 IST2017-08-04T10:43:36+5:302017-08-04T16:13:36+5:30

किशोर कुमार यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि गायक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले होते. त्यांना जाऊन ...

Kishore Kumar was made to marry Madhubala Karim Abdul | ​मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार बनले होते करीम अब्दुल

​मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार बनले होते करीम अब्दुल

शोर कुमार यांनी एक अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि गायक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले होते. त्यांना जाऊन अनेक वर्षं झाली असली तरी आजही किशोर कुमार यांची गाणी, त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. त्यांची गाणे तर आजही लोक आवडीने ऐकतात. सगळ्याच वयोगटातील लोकांना किशोर यांची गाणी प्रचंड आवडतात. ४ ऑगस्टला किशोर कुमार यांचा जन्म इंदौरमधील खंडवा मध्ये झाला होता. किशोर कुमार यांना त्यांच्या खंडवा या गावाविषयी प्रचंड प्रेम होते. १९८७ मध्ये त्यांनी मुंबई सोडून इंदोरला राहायला जायचे ठरवले होते. पण त्याचवर्षी १८ ऑक्टोबरला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
किशोर कुमार यांनी राजेश खन्नासाठी अनेक गाणी गायली. ही सगळीच गाणी प्रचंड हिट झाली. त्यामुळे किशोर कुमार यांच्या निधनानंतर माझा आवाज गेला अशी प्रतिक्रिया राजेश खन्ना यांनी दिली होती. किशोर कुमार यांना सर्वोत्कृष्ट गायक म्हणून फिल्मफेअरचा आठ वेळा पुरस्कार मिळाला होता. किशोर कुमार खरे तर गायक बनण्यासाठी मुबंईत आले होते. पण एक अभिनेता म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी काहीच काळात एक अभिनेता आणि गायक म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 
किशोर कुमार यांच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले. त्यांनी चार लग्न केली होती. त्यांचे पहिले लग्न रूमा देवीशी झाले होते. पण त्यांच्यात सतत वादविवाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अमित या त्यांच्या मुलाचा सांभाळ किशोर यांनीच केला. त्यानंतर काही वर्षांनी मधुबालासोबत त्यांनी लग्न केले. मधुबाला ही त्याकाळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाची त्याकाळात चांगलीच चर्चा झाली होती आणि त्यातही त्या काळातील सुपरस्टार दिलीप कुमार त्यांच्या प्रेमात वेडे झाले होते. मधुबाला यांचे देखील दिलीप कुमार यांच्यावर प्रेम होते. पण मधुबाला यांनी दिलीप कुमार यांच्याशी लग्न न करता किशोर कुमार यांच्याशी लग्न केले. मधुबाला या मुसलमान असल्याने किशोर कुमार यांनी त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मांतर केले होते. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारून करिम अब्दुल असे त्यांचे नाव ठेवले होते. पण लग्नाच्या आधीपासूनच मधुबाला आजारी होत्या. लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांनी योगिता बालीसोबत विवाह केला. पण योगिता बालीने किशोर कुमार यांना सोडून मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले. किशोर कुमार यांच्यासाठी तो एक धक्का होता. त्यामुळे त्यांनी त्यानंतर कधीच मिथुनसाठी पार्श्वगायन केले नाही. योगिता बाली यांच्यानंतर त्यांनी लीना चंदावरकर यांच्याशी लग्न केले. लीना आणि किशोर कुमार यांना सुमीत नावाचा एक मुलगा देखील आहे. 

Also Read : ​‘हुस्र की मल्लिका’ मधुबालाच्या आयुष्यात आल्या ‘या’ व्यक्ती!

Web Title: Kishore Kumar was made to marry Madhubala Karim Abdul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.