कीर्ती कुल्हारीचा मुलांना सल्ला; ‘ब्ल्यू व्हेल गेम’पासून दूर रहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 22:27 IST2017-08-05T16:57:41+5:302017-08-05T22:27:41+5:30

अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिने म्हटले की, गेम्स खेळणे आनंददायी असते, परंतु जर तो गेम तुमच्या जिवावर बेतत असेल तर ...

Kirti Kulhari's children advice; Stay away from 'Blue Whale Game'! | कीर्ती कुल्हारीचा मुलांना सल्ला; ‘ब्ल्यू व्हेल गेम’पासून दूर रहा!

कीर्ती कुल्हारीचा मुलांना सल्ला; ‘ब्ल्यू व्हेल गेम’पासून दूर रहा!

िनेत्री कीर्ती कुल्हारी हिने म्हटले की, गेम्स खेळणे आनंददायी असते, परंतु जर तो गेम तुमच्या जिवावर बेतत असेल तर त्यापासून दूर राहिलेलेच बरे. कीर्तीने हा संदेश ‘द ब्ल्यू व्हेल’ या इंटरनेट गेमच्या प्रभावात आल्यानंतर कथित आत्महत्या केल्यानंतर दिला आहे. कीर्तीने आयएएनएसशी शुक्रवारी बोलताना याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कीर्तीने म्हटले की, ‘हा व्हिडीओ सर्व मुलांसाठी आहे. मी नुकतेच वृत्तपत्रात या गेमविषयी वाचले होते. हा खूपच धक्कादायक आणि खतरनाक आॅनलाइन गेम आहे. मी सोशल मीडियावरील अशाप्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचा आग्रह करते.’

पुढे बोलताना कीर्तीने म्हटले की, ‘कृपया गेममध्ये देण्यात आलेल्या पर्यायाची समजदारी आणि परिपक्वतेने निवड करा. गेम खेळणे आनंददायक आहे. परंतु हा गेम तुम्हाला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला संकटात टाकू शकतो, हेही तेवढेच खरे आहे. या गेमविषयी समजून घेणे योग्य आहे; परंतु त्यावर अंमलबजावणी करणे पूर्णत: चुकीचे आहे. ‘इंदू सरकार’मध्ये झळकलेल्या कीर्तीने म्हटले की, ‘माझ्यावर विश्वास ठेवा, आयुष्य तुम्हाला खूप संधी देत असते. त्यामुळे अशाप्रकारच्या स्टूपिड खेळांसाठी स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. 



गेल्या ३० जुलै रोजी अंधेरी ईस्टमधील शेर-ए-पंजाब कॉलनीतील एका १४ वर्षीय मुलाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपविले होते. अशी शक्यता वर्तविली जात आहे की, या मुलाला ‘ब्ल्यू व्हेल’ गेममधील एक टास्क पूर्ण करण्यासाठीच आत्महत्या केली असावी. कारण नववीत शिकत असलेल्या या मुलाने त्याच्या मित्राला ‘मी इमारतीवरून उडी घेत आहे,’ असा मोबाइलवरून मॅसेज पाठविला होता. 

या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तोपर्यंत बराच वेळ झाला होता. कारण त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतानाच त्याने इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपविले होते. सध्या या ब्ल्यू व्हेलमुळे अनेक मुले अशाप्रकारचा प्रयत्न करीत असल्याने काही दिवसांपूर्वीच महानायक अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांनी चिंता व्यक्त केली होती. आता कीतीनेही पुढाकार घेतल्याने मुलांना या गेमपासून दूर राहायला हवे. 

Web Title: Kirti Kulhari's children advice; Stay away from 'Blue Whale Game'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.