तैमूरची दृष्ट काढणाऱ्या किन्नरला किरणा कपूरने दिले ५१ हजार रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 13:46 IST2017-07-07T16:48:47+5:302017-07-08T13:46:21+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका तैमूर सध्या स्टार किड्स बनला आहे. त्याचे फॅन्स फॉलोविंग इतर स्टार किड्सच्या तुलनेत अधिक ...

Kiran Kapoor gave 51 thousand rupees to Kinnar, who made the tiemur look! | तैमूरची दृष्ट काढणाऱ्या किन्नरला किरणा कपूरने दिले ५१ हजार रुपये!

तैमूरची दृष्ट काढणाऱ्या किन्नरला किरणा कपूरने दिले ५१ हजार रुपये!

लिवूड अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका तैमूर सध्या स्टार किड्स बनला आहे. त्याचे फॅन्स फॉलोविंग इतर स्टार किड्सच्या तुलनेत अधिक आहे. लोकांना त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडत आहे. त्याचा नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो काय? याचीही लोकांना प्रतीक्षा असते. कारण तैमूर दिसतोच एवढा गोंडस की, कोणालाही त्याचा लळा लागेल. गोरापान, निळे डोळे, गोल चेहरा असा काहीसा लूक असलेल्या तैमूरची एक झलक बघण्यासाठी लोक आतुर असतात. यामुळे तैमूरला लोकांची दृष्ट तर लागत नाही ना? असे मम्मी करिनाला वाटत आहे. त्यामुळे करिनाने आपल्या लाडक्याची दृष्ट काढली आहे; मात्र दृष्ट काढणाºयाला करिनाने दिलेली रक्कम ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. 

होय, करिनाने आपल्या लाडक्याची दृष्ट एका किन्नरकडून काढली असून, त्यासाठी तिने तब्बल ५१ हजार रुपये मोजले आहेत. करिनाचा हा दिलदारपणा अनेकांना अचंबित करणारा आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर परिवारात तैमूर सर्वात लहान असल्याने तो सगळ्यांचाच लाडका आहे. वास्तविक कपूर परिवारात दृष्ट काढण्याची पारंपरिक पद्धत आहे. हीच पद्धत करिनाने पूर्ण केली आहे. परिवारातील सर्वात लहान असलेल्या मुलाची आतापर्यंत कपूर परिवाराने दृष्ट काढली आहे; मात्र तैमूरची दृष्ट काढण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लोकांचे लक्ष लागून असते. त्यामुळेही त्याला दृष्ट होत असावी, असा समज मम्मी करिनाचा होत आहे. 

यावेळी करिनाने आपल्या लाडक्याला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या हातात व पायात काळा धागाही बांधला आहे. काही दिवसांपूर्वी तैमूर तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा तो बाल्कनीत असलेल्या पाळण्यात बसून पाऊस एन्जॉय करीत होता. तैमूरचा हा फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर तैमूर जसजसा मोठा होत आहे, तशी त्याची माध्यमांमधील लोकप्रियता वाढत आहे. असो, सध्या करिना तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाली असून, लवकरच ती ‘वीरे दि वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यासाठी ती विदेशात जाणार असून, तैमूरलाही सोबत घेऊन जाणार आहे. तैमूरची ही पहिलीच विदेशवारी असेल. 

Web Title: Kiran Kapoor gave 51 thousand rupees to Kinnar, who made the tiemur look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.