‘फॅन’सह किंग खानचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 21:18 IST2016-03-01T04:18:10+5:302016-02-29T21:18:10+5:30

​ शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्ये गरम आहे.

King Khan's thrill with 'Fan' | ‘फॅन’सह किंग खानचा थरार

‘फॅन’सह किंग खानचा थरार

 
ाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची चर्चा बॉलीवूडमध्ये गरम आहे. शाहरूखनचा हा फॅन आपल्यापेक्षा काय वेगळा आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. जबरा फॅन म्हणजे नक्की कसा? असा प्रश्न ते स्वत:लाच विचारत आहेत. ‘फॅन’ चित्रपटाचा एक नवीन ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. त्यात आर्यन खन्ना ( शाहरूख खान) आणि गौरव (फॅन) यांना दाखवण्यात आले आहे. 

‘डर’ चित्रपटात ज्याप्रमाणे शाहरूखने एक थरार त्याच्या अभिनयातून दाखवला होता. तसाच थरार आता फॅन आणि आर्यन यांच्या भूमिके तून दिसणार आहे. ‘अ सुपरस्टार इज नथिंग विदाऊट अ फॅन’ आणि ‘फॅन एक्झिस्टन्स इज कनेक्टेड विथ द एक्झिस्टन्स आॅफ अ स्टार’ असे या चित्रपटाविषयी म्हणण्यात येत आहे. 

गौरव या फॅनचे म्हणणे असते की, त्याला सुपरस्टार आर्यन खन्ना याला स्वत:च्या हाताने ट्रॉफी द्यायची असते. गौरव ट्रॉफी देण्यासाठी कोणत्या पातळीवर जातो ? हे या चित्रपटात उत्तम दाखवण्यात आले आहे. निर्माता आदित्य चोप्रा यांचा यशराज फिल्म्स बॅनरखालील ‘फॅन’ हा चित्रपट १५ एप्रिल २०१६ रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: King Khan's thrill with 'Fan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.