कियारा आडवाणीच्या घरी नाताळची तयारी; सजवला ख्रिसमस ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:42 PM2023-12-10T17:42:39+5:302023-12-10T17:43:23+5:30

अभिनेत्री कियारा अडवाणीनेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर ख्रिसमसच्या तयारीची एक झलक शेअर केली आहे.

Kiara Advani shares glimpse of first christmas preparation after marriage with Sidharth Malhotra | कियारा आडवाणीच्या घरी नाताळची तयारी; सजवला ख्रिसमस ट्री!

कियारा आडवाणीच्या घरी नाताळची तयारी; सजवला ख्रिसमस ट्री!

भारतासह जगभरात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस या सणाची प्रत्येकजण वाट पाहत असतो. उंचच उंच आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलेले ख्रिसमस ट्री हे नाताळात सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असतात. अभिनेत्री कियारा अडवाणीनेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर ख्रिसमसच्या तयारीची एक झलक शेअर केली आहे.

25 डिसेंबर रोजी जगभरात हा सण साजरा केला जाणार आहे. हा दिवस येशूचा जन्मदिवस आहे. हा सण जरी ब्रिटीशांचा असला तरी सेलिब्रिटीही तो मोठ्या थाटामाटात साजरा करतात. प्रत्येकाच्या घरात ख्रिसमसची सजावट सुरू झाली आहे.  कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच ख्रिसमस असणार आहे. कियाराने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये कियाराने तिच्या घरातील ख्रिसमस ट्रीची एक झलक दाखवली आहे. ज्यात ख्रिसमस ट्री सजवलेला दिसत आहे. 

कियारा आणि सिद्धार्थने 7 फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेरमध्ये लग्न केले होते. याआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कियारा लवकरच 'गेम चेंजर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती राम चरणसोबत झळकणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर सिद्धार्थ लवकरच करण जोहर निर्मित 'योद्धा' या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय सिद्धार्थ रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स'मध्येही तो पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Kiara Advani shares glimpse of first christmas preparation after marriage with Sidharth Malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.