केतन मेहता आऊट; आता ‘या’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात कंगना बनणार झाशीची राणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 15:16 IST2017-03-21T09:46:00+5:302017-03-21T15:16:00+5:30
‘रंगून’नंतर कंगना राणौतने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. यानंतर २३ मार्चपासून कंगना कामावर परतणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या ...

केतन मेहता आऊट; आता ‘या’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात कंगना बनणार झाशीची राणी!
‘ ंगून’नंतर कंगना राणौतने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. यानंतर २३ मार्चपासून कंगना कामावर परतणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या बायोपिकचा पहिला सीन यादिवशी शूट होणार आहे. आधी हा चित्रपट केतन मेहता दिग्दर्शित करणार होते. पण आता केतन मेहता नाही तर तेलगू फिल्ममेकर क्रिस हा चित्रपट डायरेक्टर करणार आहेत. क्रिस यांनी याआधी ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. गेल्या दोन वर्षांपासून या बायोपिकच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु होते. आता हा चित्रपट फ्लोरवर येणार म्हणतानाच अचानक केतन मेहता यांना यातून डच्चू देण्यात आला. या चित्रपटाचे नाव ‘मणिकर्णिका’(राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मावेळीचे नाव) असल्याचे कळते.
या चित्रपटाची स्क्रिप्ट के. व्ही. विजयेंन्द्र प्रसाद यांनी लिहिली आहे. विजयेन्द्र प्रसाद तेच सुप्रसिद्ध पटकथाकार आहेत, ज्यांनी बाहुबली आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांची पटकथा लिहिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन मेहतानंतर क्रिस एका पूर्णत: नव्या टीमसह या चित्रपटाच्या कामास सुरुवात करतील. या चित्रपटासाठी कंगना गेल्या दोन वर्षांपासून घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकते आहे.
अलीकडे आलेला कंगनाचा ‘रंगून’ हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. आता कंगनाला एका नव्या हिटची गरज आहे. अशावेळी साहजिक या बायोपिककडून तिला मोठ्या अपेक्षा आहेत.
नुकताच करण जोहर आणि कंगना यांच्यातील एपिसोड गाजला होता. ‘कॉफी विद करण’मध्ये कंगनाने करणला डिवचले होते. करणला फिल्मी माफिया म्हणण्यापर्यंत कंगना गेली होती. यानंतर करणनेही कंगनाचा खरपूस समाचार घेतला होता. कंगनाला इतकाच त्रास होत असेल तर तिने बॉलिवूड सोडावे, असा थेट सल्ला त्याने दिला होता. अर्थात कंगनाने यावरही करणला सुनावले होते. मला इंडस्ट्री सोडायला सांगण्याचा करणला काहीही अधिकार नाही. ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या २० वर्षी भेट दिलेला एखादा स्टुडिओ नाहीयं. ही इंडस्ट्री प्रत्येक भारतीयाची आहे आणि इथे काम करण्याचा माज्यासकट सर्वांनाच अधिकार आहे. माझ्यासारख्या बाहेरून आलेल्यांना इथे सन्मान मिळतो, असे तिने करणला सुनावले होते.