केरळ फिल्म इंडस्ट्रीचा शाहरुखला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 15:03 IST2016-01-16T01:14:38+5:302016-02-10T15:03:03+5:30

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक बी उन्नीकृष्णन आणि विनोदी अभिनेता जगदीश यांनी शाहरुखचं सर्मथन केलंय. जगदीश म्हणाले, की शाहरुखवरील टीका ही ...

Kerala Film Industry support Shahrukhla | केरळ फिल्म इंडस्ट्रीचा शाहरुखला पाठिंबा

केरळ फिल्म इंडस्ट्रीचा शाहरुखला पाठिंबा

्याळम चित्रपट दिग्दर्शक बी उन्नीकृष्णन आणि विनोदी अभिनेता जगदीश यांनी शाहरुखचं सर्मथन केलंय.

जगदीश म्हणाले, की शाहरुखवरील टीका ही फॅसिस्ट विचारसरणीचं द्योतक आहे. या विचारसरणीला पाठिंबा देता कामा नये. मी शाहरुखबरोबर एका चित्रपटात काम केलंय. तो सर्वार्थानं धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत.

उन्नीकृष्णन यांनी नमूद केलंय, की शाहरुखनं हे वक्तव्य करताना मनात कुठलेही छुपे हेतू बाळगलेले नाहीत. भाजपानं असे वाद टाळायला हवेत.

दरम्यान, केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही. एम. सुधीरन म्हणाले, की शाहरुखवर टीका करणार्‍या भाजपा नेत्यांविरुद्ध योग्य ती कारवाई तातडीनं करायला हवी.

Web Title: Kerala Film Industry support Shahrukhla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.