Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:28 PM2018-11-12T15:28:45+5:302018-11-12T15:29:13+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या टीजरप्रमाणेच ट्रेलरही शानदार आहे.

Kedarnath Trailer: Sushant Singh Rajput and Sara Ali 'Kedarnath' trailer out | Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर

Kedarnath Trailer : पाहा, ‘केदारनाथ’चा शानदार ट्रेलर

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या टीजरप्रमाणेच ट्रेलरही शानदार आहे. केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तूर्तास यावरूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करत, केदारनाथमधील पुजाºयांनी आणि हिंदू संघटनांनी ‘केदारनाथ’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


या वादादरम्यान दिग्दर्शक अभिषेक कपूर, सारा अली खान व सुशांत सिंग राजपूत यांच्या उपस्थितीत ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील सारा आणि सुशांत यांचा अभिनय बघण्यासारखा आहे. केदारनाथमधील मनोहारी दृश्ये, विनाशकारी महाप्रलय सगळे काही चित्तथरारक आहेत. पहिल्याच चित्रपटातील साराचा अभिनयही प्रेमात पाडणारा आहे. तुम्हीही बघा आणि हा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.
‘केदारनाथ’ या चित्रपटाने सुरूवातीला बरेच वाद ओढवून घेतले. निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यातील वाद कोर्टापर्यंत पोहोचला. हा वाद इतका विकोपाला गेला होता की, चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होत. शूटिंग सुरू असतानाच प्रेरणाने निर्मितीतून माघार घेतल्याने अभिषेकसमोर मोठा पेच उभा राहिला होता. अखेर रॉनी स्क्रूवालाने निर्मितीची जबाबदारी स्विकारली आणि ‘केदारनाथ’चा मार्ग सुकर झाला. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

Web Title: Kedarnath Trailer: Sushant Singh Rajput and Sara Ali 'Kedarnath' trailer out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.