४४ डिग्री तपमानातील कॅटरिना कैफचा हा लूक करेल तुम्हाला घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 22:48 IST2017-08-06T17:17:47+5:302017-08-06T22:48:20+5:30

सध्या कॅट तिच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज् तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॅटचे हे ४४ डिग्री तपमानातील फोटो सध्या सोशल मीडियावर आग लावत आहेत.

Katrina Kaifcha in 44 degree temperature will make you look wounded! | ४४ डिग्री तपमानातील कॅटरिना कैफचा हा लूक करेल तुम्हाला घायाळ!

४४ डिग्री तपमानातील कॅटरिना कैफचा हा लूक करेल तुम्हाला घायाळ!

टरिना कैफ अशी सेलिब्रिटी आहे, जी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. तिचे सौंदर्य चाहत्यांना असे काही भावते की, कॅटचा न्यू लूक फोटो समोर येताच तो चाहत्यांकडून वाºयासारखा व्हायरल केला जातो. सध्या कॅट तिच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज् तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॅटचे हे ४४ डिग्री तपमानातील फोटो सध्या सोशल मीडियावर आग लावत आहेत. 

सध्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाची शूटिंग जोरात सुरू आहे. दररोज या चित्रपटाच्या सेटवरील कुठला ना कुठला फोटो समोर येत असल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता वाढत आहे. नुकतेच मोरक्को येथील चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. आता अबूधाबी येथे शूटिंग केली जाणार असून, त्यासाठी सलमान आणि कॅटरिना लवकरच अबूधाबीला रवाना होणार आहेत. खरं तर कॅटरिनाने आतापर्यंत या चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. परंतु आता शेअर केलेले फोटो खूपच हॉट असून, तिच्या चाहत्यांमध्ये तपमान वाढविणारे आहेत. 
 

‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. तर ‘टायगर जिंदा है’च्या दिग्दर्शनाची धुरा अब्बास जफर सांभाळत आहे. कॅटविषयी सांगायचे झाल्यास सध्या ती प्रचंड व्यस्त आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त आमीर खानच्या ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. त्याचबरोबर शाहरूखबरोबरही ती आनंद एल रॉयच्या चित्रपटात काम करणार आहे. 

Web Title: Katrina Kaifcha in 44 degree temperature will make you look wounded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.