कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चं टायटल ट्रॅक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:06 PM2023-12-26T17:06:48+5:302023-12-26T17:08:34+5:30

Merry Christmas : 'टाइगर ३' चित्रपटाचा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत असलेली कतरिना कैफ लवकरच 'मेरी ख्रिसमस' चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Katrina Kaif-Vijay Sethupathi movie 'Merry Christmas' title track release | कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चं टायटल ट्रॅक रिलीज

कतरिना कैफ-विजय सेतुपतीचा चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चं टायटल ट्रॅक रिलीज

टाइगर ३ चित्रपटाचा ग्रॅण्ड सक्सेस एन्जॉय करत असलेली कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कतरिना कैफ पहिल्यांदाच साऊथचा स्टार विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता निर्मात्यांनी मेरी ख्रिसमसचे टायटल ट्रॅक रिलीज केले आहे.

मेरी ख्रिसमसच्या गाण्याची ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. निर्मात्यांनी कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीच्या फोटोसोबत ऑडिओ क्लीप रिलीज केली आहे. हे शेअर करत टिप्सने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लिहिले की, परफेक्ट  #MerryChristmas गाणं १२ जानेवारीला थिएटरमध्ये पाहायला मिळेल. नुकतेच रिलीज झालेले मेरी ख्रिसमसचं टायटल ट्रॅक ऐश किंगने गायले आहे आणि या गाण्याला संगीत प्रीतमने दिले आहे. या गाण्याला खूप पसंती मिळत आहे.

'मेरी ख्रिसमस'चे दिग्दर्शन केलंय श्रीराम राघवन 
'मेरी ख्रिसमस'चे दिग्दर्शन श्रीराम राघवनने केले आहे. त्याने यापूर्वी बदलापूर आणि अंधाधुन सारखे हिट चित्रपट केले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चित्रपटात विजय आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीमध्ये खूप ताजेपणा आहे आणि तो प्रेक्षकांना प्रभावित करू शकतो.

'मेरी ख्रिसमस' कधी रिलीज होणार?
'मेरी ख्रिसमस' दोन भाषांमध्ये वेगवेगळ्या सहाय्यक कलाकारांसोबत शूट करण्यात आला आहे. हिंदी आवृत्तीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांच्याही भूमिका आहेत. दुसरीकडे, राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांनी तमिळ आवृत्तीत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मेरी ख्रिसमस १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 

Web Title: Katrina Kaif-Vijay Sethupathi movie 'Merry Christmas' title track release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.