कॅटरिना कैफ दिसली सलमान खानसोबत लंच करताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 13:07 IST2017-09-02T07:35:14+5:302017-09-02T13:07:33+5:30

अली अब्बास जफर दिग्दर्शित "टायगर जिंदा है" या चित्रपटाद्वारे सलमान खान आणि कॅटरिना कैफ तब्बल ५ वर्षानंतर एकत्र येत ...

Katrina Kaif seen with lunch with Salman Khan ... | कॅटरिना कैफ दिसली सलमान खानसोबत लंच करताना...

कॅटरिना कैफ दिसली सलमान खानसोबत लंच करताना...

ी अब्बास जफर दिग्दर्शित "टायगर जिंदा है" या चित्रपटाद्वारे सलमान खान आणि कॅटरिना कैफ तब्बल ५ वर्षानंतर एकत्र येत आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपटाची शूटिंग अबु धाबीमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अलीने म्हटले होते की चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटला घेऊन मी खूपच नर्व्हस आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि कॅटरिना दिवसरात्र एक करून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या कामात लागले होते. त्यामुळेच त्याने पूर्ण टीमला ब्रेक देऊन अबू दाबी मध्ये आऊटिंग केले. त्यादरम्यानचे फोटो त्यांने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्यात सलमान कॅटरिना अंगद बेदी आणि इतर कलाकार लंच करताना दिसत आहेत. 

ALSO READ : ​सलमान खान व कॅटरिना कैफ आपल्या जुन्या रिलेशनशिपला देणार का दुसरी संधी?

काही दिवसांपूर्वी कॅटरिनाला सलमान आणि तिच्या नात्याबद्दल विचारले असता ती म्हणाली सलमान आणि माझे नाते समजावणे थोडे कठीण आहे. सलमान आणि मी कुठल्याही विषयावर बोलु शकतो आणि एकमेकांसोबत काहीही शेअर करू शकतो. आम्हाला एकमेकांविषयी फार आदर आहे आणि ही गोष्ट एक नात्यामध्ये फार महत्वाची असते. 
तुम्हाला माहीत असेलच रणबीर कपूरसोबत नाव जुळण्याच्या आधी तिचे नाव सलमान बरोबर जोडले जात होते. सलमानने तिच्यासाठी शाहरुख खानबरोबर भांडण सुद्धा केले होते. रणबीरबरोबर झालेल्या ब्रेकअप नंतर ती पुन्हा सलमान बरोबर दिसू लागली एवढेच नाही तर सलमान मुळेच तिला टायगर जिंदा है चित्रपटात संधी मिळाली. सलमान कॅटरिनाचा 'टायगर जिंदा है' २२डिसेंबरला रिलीज होत आहे. सध्या या चित्रपटाचे ४५ दिवसांचे शूटिंग अबु दाबीमध्ये होत आहे त्यानंतर सलमान आपल्या आगामी चित्रपट 'रेस३' चे शूटिंग सुरू करेल.

Web Title: Katrina Kaif seen with lunch with Salman Khan ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.