​ कॅटरिना कैफ बनणार का प्रभासची ‘लेडी बाहुबली’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 11:52 IST2017-05-14T06:22:05+5:302017-05-14T11:52:05+5:30

‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर चाहत्यांना प्रभासच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. निश्चितपर्यत ‘बाहुबली2’ पाहिलेले लोक अद्यापही ‘बाहुबली मोड’मधून बाहेर येऊ शकलेले ...

Katrina Kaif to become Prabhaschi 'Lady Bahubali'? | ​ कॅटरिना कैफ बनणार का प्रभासची ‘लेडी बाहुबली’?

​ कॅटरिना कैफ बनणार का प्रभासची ‘लेडी बाहुबली’?

ाहुबली2’च्या अभूतपूर्व यशानंतर चाहत्यांना प्रभासच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे. निश्चितपर्यत ‘बाहुबली2’ पाहिलेले लोक अद्यापही ‘बाहुबली मोड’मधून बाहेर येऊ शकलेले नाहीत. पण तरिही प्रभासच्या नव्या चित्रपटाबद्दल त्याचे चाहते उत्सूक आहे. ‘बाहुबली2’सोबत प्रभासच्या या आगामी चित्रपटाची एक झलक आपण पाहिली आहेच. होय, प्रभास ‘बाहुबली2’नंतर ‘साहो’ या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीजर ‘बाहुबली2’सोबत दाखवला जात आहे.‘साहो’च्या टीजरनेही प्रेक्षकांना इंप्रेस केले आहे. याच चित्रपटाबद्दल आता एक नवी बातमी ऐकायला मिळतेय. होय, कॅटरिना कैफ या चित्रपटात दिसू शकते, हीच ती बातमी. ‘साहो’मध्ये प्रभासच्या अपोझिट कॅटरिनाची वर्णी लागू शकते. अर्थात या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण असे झालेच तर प्रभास व त्याची लेडी ‘बाहुबली’ कॅटरिना कैफ या दोघांना आॅनस्क्रीन एकत्र पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


ALSO READ : ब्लॉकबस्टर ‘बाहुबली-२’मध्येही झाल्या चुका!

गत पाच वर्षांपासूनन प्रभास ‘बाहुबली’ सीरिजमध्ये बिझी होता. ‘बाहुबली2’ रिलीज झाल्यानंतर प्रभास सध्या अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करतो आहे. जवळपास दोन महिने तो अमेरिकेतच राहणार आहे. यानंतर तो जुलैमध्ये ‘साहो’चे शूटींग सुरु करणार आहे. तसे गेल्या अनेक दिवसांपासून प्रभास ‘बाहुबली’शिवाय वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी अलीकडे खुलासा केला होता की, त्यांनी प्रभासला ‘बाहुबली’च्या दोन्ही पार्टसाठी दीड वर्षांचा वेळ मागितला होता. पण प्रभासने त्यांना पाच वर्षांचा काळ दिला. त्याचे फळ सगळ्यांसमोर आहे. प्रभासने अलीकडे एका जाहिरातीची १८ कोटींची आॅफर धुडकावून लावली. कारण सध्या त्याला केवळ आराम करायचा आहे.

Web Title: Katrina Kaif to become Prabhaschi 'Lady Bahubali'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.