कतरिना कैफ आणि विजयचा सिनेमा 'मेरी ख्रिसमस' OTTवर या दिवशी होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:38 PM2024-03-05T20:38:40+5:302024-03-05T20:39:43+5:30

Katrina Kaif And Vijay Sethupathi : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी ख्रिसमस हा चित्रपट यावर्षी १२ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे.

Katrina Kaif and Vijay Sethupathi's movie 'Merry Christmas' will be released on OTT on this day | कतरिना कैफ आणि विजयचा सिनेमा 'मेरी ख्रिसमस' OTTवर या दिवशी होणार दाखल

कतरिना कैफ आणि विजयचा सिनेमा 'मेरी ख्रिसमस' OTTवर या दिवशी होणार दाखल

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट यावर्षी १२ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे, त्यामुळे चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला ज्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. बॉक्स ऑफिसनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 

मेरी ख्रिसमसमध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चाहत्यांना ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. विजय आणि कतरिनाची जोडी खूप आवडली आहे. मेरी ख्रिसमस चित्रपट ८ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहण्यासाठी कतरिनाचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता प्रतीक्षा संपली आहे.

बॉक्स ऑफिसवर अशी केली कामगिरी
मेरी ख्रिसमसच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ २.५५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटासाठी १० कोटींची कमाई करणेही कठीण झाले होते. चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन २६.२५ कोटी होते.

चित्रपटाबद्दल...
मेरी ख्रिसमसच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ही हत्या नाताळच्या रात्री घडते. मारिया आणि अल्बर्ट त्या दिवशी भेटतात आणि दोघेही प्रेमात पडतात. कतरिना आणि विजयशिवाय या चित्रपटात संजय कपूर, राधिका आपटे, टिनू आनंद आणि विनय पाठक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

Web Title: Katrina Kaif and Vijay Sethupathi's movie 'Merry Christmas' will be released on OTT on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.