कतरिनाने पकडलाय कोणाचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 15:53 IST2016-06-20T10:23:04+5:302016-06-20T15:53:04+5:30
नुकत्याच झालेल्या एका इफ्तार पार्टीमध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान दोघेही उपस्थित होते. या पार्टीत कतरिनाने सलमान अथवा त्याच्या ...
कतरिनाने पकडलाय कोणाचा हात?
न कत्याच झालेल्या एका इफ्तार पार्टीमध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान दोघेही उपस्थित होते. या पार्टीत कतरिनाने सलमान अथवा त्याच्या कुटुंबियांसोबत एंट्री न करता दिग्दर्शक अली अब्बास झाफरसोबत एंट्री केली. या इफ्तार पार्टीत कतरिना केवळ अलीसोबत आलीच नाही तर तिने कारमधून उतरल्यापासून ते आतमध्ये जाईपर्यंत अलीचा हात पकडला होता. पार्टी संपल्यावरही ती अलीसोबतच निघून गेली असे म्हटले जाते. अलीने दिग्दर्शित केलेल्या मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटात तिने काम केले होते. तेव्हापासूनच अली आणि कतरिनाची खूप चांगली मैत्री आहे. अलीने सुलतान या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रणबीर आणि तिच्या ब्रेकअपनंतर ती सलमानला भेटायला गेली त्यावेळीही अली तिथे उपस्थित होता. इफ्तार पार्टीत कतरिनाने अलीचा हात पकडल्याने उपस्थितांच्या भुवया नक्कीच उंचावल्या होत्या.