कॅट माझ्या कामाची नाही - सल्लू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:52 IST2016-01-16T01:14:56+5:302016-02-07T11:52:42+5:30

सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच तो 'कॉमेडी ...

Kat is not my job - Sallu | कॅट माझ्या कामाची नाही - सल्लू

कॅट माझ्या कामाची नाही - सल्लू

मान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच तो 'कॉमेडी नाईट विद कपिल' मध्ये आला होता. येथे सलमान कॅटरिनाविषयी जे बोलला ते ऐकून सर्वजण हैराण झाले.

या शोमध्ये दिवाळीचा एपिसोड शूट करण्यात आला आहे. त्यामुळे सेटवर दिवाळीचे वातावरण होते. बरेच बॉम्ब आणि फटाके सेटवर ठेवण्यात आले होते. सलमान खुपच मस्तीच्या मुडमध्ये दिसत होता.

जेव्हा एका बॉम्बच्या पॅकेटवर कॅटरीनाचा फोटो दिसला तेव्हा सलमानने कपिलला विचारले,' हिचा फोटो लावायची काय गरज होती? ही तुझ्या काय कामाची आहे. ही तर माझ्याही कोणत्याच कामाची नाही.'

salman

कॅटरीना बॉलीवूडमध्ये एवढय़ा उंचीवर पोहोचण्यात सलमानचा हात आहे. या गोष्टीला कॅटरीनाही मानते. एकावेळी सलमान आणि कॅटरीना रिलेशनशिपमध्ये होते.

परंतु, आज या दोघांमध्ये खुप अंतर निर्माण झाले आहे. आता कॅट-रणबीर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असून लग्न करण्याच्या विचारात आहेत.

salman

Web Title: Kat is not my job - Sallu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.