गोविंदाच्या भाचीची लगीनघाई, पण मामाच गैरहजर! कश्मीरा शाह म्हणाली- "ते जर आले तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 08:51 AM2024-04-24T08:51:18+5:302024-04-24T08:51:58+5:30

आरतीच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात गोविंदा मात्र कुठेच दिसला नाही. 

kashmira shah said i will touch govinda feet if he come to aarti singh wedding | गोविंदाच्या भाचीची लगीनघाई, पण मामाच गैरहजर! कश्मीरा शाह म्हणाली- "ते जर आले तर..."

गोविंदाच्या भाचीची लगीनघाई, पण मामाच गैरहजर! कश्मीरा शाह म्हणाली- "ते जर आले तर..."

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आरती सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आरतीच्या विवाहपूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकताच तिचा संगीत सोहळा पार पडला. आरतीच्या संगीत सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात गोविंदा मात्र कुठेच दिसला नाही. 

आरती सिंहच्या वेडिंग फंक्शनमध्ये भाऊ कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. गोविंदा आणि कृष्णाच्या कुटुंबीयांमध्ये मतभेद असल्याने तो या लग्नाला उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आरतीच्या लग्नाची पत्रिका मामा गोविंदाला देणार असल्याचं याआधी कृष्णाने सांगितलं होतं. आता कश्मिराने गोविंदा लग्नात येणार की नाही याबाबत पिंकविलाशी बोलताना भाष्य केलं. 

ती म्हणाली, "आम्ही लग्नात त्यांचे स्वागत करण्यास इच्छुक आहोत. ते माझ्या सासऱ्यांच्या जागी आहेत. त्यामुळे परंपरेप्रमाणे मी नक्कीच त्यांचा आदर करत पाया पडेन. त्यांना माझी आणि कृष्णाची अडचण होत असेल. पण, आरतीचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते आरतीच्या लग्नात सहभागी होतील, असं आम्हाला वाटतं. आमच्यासाठी हा नक्कीच भावनिक क्षण असेल".

आरती सिंह दिपक चौहानशी २५ एप्रिलला लग्नबंधनात अडकणार आहे. दिपक हा एक व्यावसायिक असून त्यांचं अरेंज मॅरेज आहे. आरती ३९व्या वर्षी विवाहबंधनात अडकत आहे. नुकत्याच पार पडलेल्या संगीत सेरेमनीमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.  

Web Title: kashmira shah said i will touch govinda feet if he come to aarti singh wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.