बॉलिवूडला आणखी एक झटका, या प्रसिद्ध अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 15:42 IST2021-03-22T15:41:43+5:302021-03-22T15:42:26+5:30

या अभिनेत्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे.

Kartik Aaryan tests Covid positive, asks fans to pray for him | बॉलिवूडला आणखी एक झटका, या प्रसिद्ध अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

बॉलिवूडला आणखी एक झटका, या प्रसिद्ध अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण

ठळक मुद्देकार्तिकने काही मिनिटांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की, मी पॉझिटिव्ह झालेला असून माझ्यासाठी प्रार्थना करा...

देशभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे आणि कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील अडकत चालले आहेत. अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज वाजपेयी, अभिनेत्री तारा सुतारिया  यांच्या पाठोपाठ आता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे.

कार्तिक आर्यन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्यानेच सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. कार्तिकने काही मिनिटांपूर्वी इन्स्टाग्रामद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे की, मी पॉझिटिव्ह झालेला असून माझ्यासाठी प्रार्थना करा...

कार्तिकची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून काहीच मिनिटांत 1 लाख 46 हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. तू लवकरात लवकर बरा होशील... तुला काहीही होणार नाही असे त्याचे चाहते त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

सध्या बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत अभिनेता रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अभिनेता आशिष विद्यार्थीनेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने सांगितले होते की, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कृपया तपासणी करून घ्या. माझ्यात कोरोनाचे कोणतेच लक्षण नाही, लवकरच मी बरा होईन. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासाठी अमूल्य आहेत. अलशुक्रान बंधु, अलशुक्रान जिंदगी.

मनोज वाजपेयीच्या टीमने त्याला कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत एक स्टेटमेंट सादर केले होते. त्यात त्यांनी नमूद केले होते की, मनोज चित्रीकरण करत असलेल्या एका चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कोरोना झाल्यानंतर मनोज वाजपेयीनेही कोव्हिड 19 टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर सिनेमाचे शूटींग काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तूर्तास मनोज वाजपेयीची प्रकृती स्थिर आहे आणि तो घरीच क्वारंटाईन असून विश्रांती घेतोय.

Web Title: Kartik Aaryan tests Covid positive, asks fans to pray for him